मांजरी- आव्हाळवाडी- वाघोली रस्त्याच्या दुरुस्तीची युवराज काकडे यांची PMRDA कडे मागणी.

दैनिक झुंजार टाईम्स
आनंदा धेंडे:- पुणे जिल्हा प्रतिनिधी
दिनांक:- १४-०१-२०२६

पुणे:- हवेली तालुक्यातील प्रमुख मार्ग असलेल्या, मांजरीखुर्द- आव्हाळवाडी- वाघोली, MDR 56 या प्रमुख जिल्हा मार्ग रस्त्याची गेली अनेक दिवसांपासून, अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. यामुळे या रस्त्यांवर छोटे मोठे अपघात होत आहेत. तसेच या रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांना याचा खूप त्रास सहन करावा लागत असून, भविष्यात जीवित हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. याच अनुषंगाने आरोग्यदूत युवराज काकडे यांनी या रस्त्याच्या दुरुस्तीचे मागणी, PMRDA अतिरिक्त आयुक्त दिपक सिंगला यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. सदर रस्ता PWD विभागाने काही महिन्यांपूर्वी PMRDA कडे वर्ग केला आहे. यामुळे सदर रस्त्याची मालकी ही सध्या PMRDA कडे आहे. या रस्त्यावर PMRDA कडून UGC योजनेतून निधी मंजूर केला जाणार आहे. जमीन अधिग्रहण करून अंदाजे वर्ष भराच्या आसपास या रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचे काम केले जाणार आहे. परंतु सध्या रस्त्याची बिकट अवस्था झाल्याने दुरुस्तीची येथील नागरिकांची अनेक दिवसांपासूनची मागणी होती. यावर PMRDA कडून या रस्त्याच्या दुरुस्तीची निविदा लवकरात लवकर काढून दुरुस्ती केली जाणार असल्याचे PMRDA अधिकाऱ्यांनी आश्वासन दिल्याचे, आरोग्यदूत युवराज काकडे यांनी सांगितले.




