राजकारण
Trending

अहमदपूर नगरपरिषदेच्या नवनिर्वाचित नगरसेविकांचे धुमधडाक्यात स्वागत.

दैनिक झुंजार टाईम्स 

राम रत्नपारखे:-  लातूर जिल्हा प्रतिनिधी 

दिनांक:- १३-०१-२०२६

लातूर:- अहमदपूर नगर परिषद निवडणूकीत धनगर समाजाच्या नवनिर्वाचित नगरसेविका भाग्यश्रीताई किरणकुमार बारमाळे, सौ. उषाताई हणमंतराव देवकते यांनी प्रचंड मताने निवडून येऊन ऐतिहासिक विजय मिळविल्या बद्दल यांचा धनगर समाजाच्या वतीने ‘ धनगर समाजाचे प्रतीक काठी आणि घोंगडे’ देऊन यथोचित सत्कार करून अभिनंदन केले व पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार ) पक्षाचे युवा नेते किरणकुमार अशोकराव बारमाळे यांची प्रमुख उपस्थिती होती. याकार्यक्रमासाठी अनिल धुळगुंडे, व्यंकटराव सुरनर, प्रा. डॉ. पांडुरंग चिलगर, प्रा. डॉ. गोपाळ माने, विठ्ठलराव देवकते, विनायक दालपे , नरसिंगराव शेंडगे, कोंडीबा माने, चंद्रकांत लवटे, ज्ञानेश्वर सुरनर, रामदास माने, माजी नगरसेवक संजय गुणाले, रामराव देवकते,ओमराजे धुळगुंडे, कविताताई माने, कल्पनाताई धुळगुंडे, शिवमालाताई माने, शिवलिला बिरादार, कालींदाताई नरवटे आदी समाज बांधव व भगिनी उपस्थित होत्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button