खेळ
Trending

मल्लयोद्धा सम्राट पुरस्कार २०२६ चा मानकरी ठरला पै. सुरज पाटील

दैनिक झुंजार टाईम्स

अमोल पाटील:- कराड प्रतिनिधी 

दिनांक:- १०-०१-२०२६

सातारा:- कराड तालुका कुस्ती संघटनेच्या संकल्पनेतून मल्लयोद्धा पुरस्कार २०२६ चे मानकरी शितुर ता. शाहुवाडीचे सुपुत्र व मोतीबाग तालमीचा पैलवान पै. सुरज पाटील यांना मिळाला. पै. सुरज पाटील मोतीबाग तालीम कोल्हापूर येथे गेली सहा-सात वर्षे कुस्तीसाठी सराव करत आहे.सांगली ,सातारा, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये एक लढवय्या पैलवान अशी एक वेगळी ओळख आहे. नामांकित पैलवानावरती सुरजने अनेक कुस्ती मैदाना मध्ये विजय संपादन केला आहे. तसेच महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत वजन गटात अंतिम फेरी पर्यंत धडक मारली आहे आपल्या आपल्या शित्तूर गावातील तालमीमध्ये त्याने पै. आनंदा भोसले (मामा ) यांच्या मार्गदर्शनात सराव करत असताना आज पर्यंत सुरजने कुस्ती मैदानामध्ये अनेक मानाच्या गदा व सन्मान चिन्ह मिळवली आहेत.

सुरज पाटील यांच्या कुस्ती क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीची दखल घेऊन कराड तालुका कुस्ती संघ कला क्रीडा सांस्कृतिक ट्रस्ट यांच्या सौजन्याने त्यास कुस्ती क्षेत्रातील मानाचा मल्लयोद्धा सम्राट पुरस्कार २०२६ देऊन सन्मानित करण्यात आले.यावेळी कुस्ती क्षेत्रातील ज्येष्ठ वस्ताद पै.आनंदा भोसले ( मामा) कुस्ती संघटक पै. तानाजी चवरे ( आप्पा) कुस्ती संघटक पै पांडुरंग पाटील- कोतोली कामगार केसरी पै.सचिन बागट (येणपे ) महाराष्ट्र चॅम्पियन पै. कुंडलिक गायकवाड कामगार केसरी पै. समिंदर जाधव – शित्तूर कुस्ती संघटक पै.राहुल मोरे भाटवडे पै. राहुल पाटील – सरपंच (खुजगाव ) पै. प्रकाश पाटील – सोडोंली पै. सुरेश नांगरे सुरेश पाटील (दादा) यात्रा कमिटी खजिनदार सुनील पाटील .पै. सदाभाऊ पाटील अशोक पाटील( मिस्त्री ) शित्तूर आदी मान्यवर उपस्थित होते. सुरज चे महाराष्ट्रातील तमाम पैलवान कुस्ती शौकिनांनी अभिनंदन यांचा वर्षाव केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button