वंचित बहुजन आघाडीचे पनवेल तालुका महासचिव अक्षय उबाळे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात संपन्न.

दैनिक झुंजार टाईम्स
पनवेल प्रतिनिधी: राजपाल शेगोकार
दिनांक:- ०५-०१-२०२६

पनवेल:- वंचित बहुजन आघाडीचे पनवेल तालुका महासचिव अक्षय गौतम भाऊ उबाळे यांचा वाढदिवस रुद्र फार्म हाऊस दुंदरे येथे मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला. यावेळी त्यांचा सर्व परिवार तसेच त्यांचे वडील भारतीय बौद्ध महासभेचे सुकापुर शाखा क्रमांक १६ चे अध्यक्ष व समाजसेवक, तसेच त्यांची आई संगीता गौतम उबाळे, त्यांची पत्नी आकांक्षा अक्षय उबाळे, व त्यांची लाडकी कन्या अविरा, त्यांची बहीण प्रज्ञा अभिषेक घोडेस्वार, अभिषेक घोडेस्वार, आजी, मामा, मामी, त्यांचा परिवार, तसेच राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघटनेचे रायगड जिल्हा सचिव राजपाल शेगोकार, पत्नी अनिता राजपाल शेगोकार , अनिकेत राजपाल शेगोकार व वंचित बहुजन आघाडीचे सुकापुर विभागीय, अध्यक्ष -मयूर पवार, महासचिव- संतोष गोटे, कोषाध्यक्ष- रोहित पवार, संघटक- सलीम शेख, प्रभाकर सावंत, सर्व पदाधिकारी त्यांच्या सर्व परिवारासह रुद्र फार्म हाऊस दुंदरे येथे अक्षय उबाळे यांचा अभिष्टचिंतन सोहळा मोठ्या थाटामाटात संपन्न झाला.





