सन्माननीय अविनाश बाबुराव रामिष्टे यांना अथांग माथाडी कामगारांनी वाढदिवसाच्या दिल्या शुभेच्छा.

दैनिक झुंजार टाईम्स
अमोल पाटील:- नवी मुंबई प्रतिनिधी
दिनांक:- २०-१२-२०२५
नवी मुंबई:- सन्माननीय अविनाश रामिष्टे वाढदिवस अभिष्टचिंतन सोहळा १७ डिसेंबर रोजी बुधवारी तुर्भे नवी मुंबई येथे उत्साहात पार पडला. माथाडींचे कैवारी, समाजसेवक, दिनदुबळ्यांचे तारणहार अशा जयघोषाने नवी मुंबईतील तुर्भे येथील ए पी एम सी मार्केट दुमदुमले. ऐतिहासिक अभिष्टचिंतन सोहळ्यात माथाडी कामगारांनी फुल ना फुलाची पाकळी म्हणून आणलेल्या शाल ,श्रीफळ, बुफे ,हार साहेबांनी स्वीकारत त्यांचे मन भरून आले. अफाट जनसंपर्क व न्याय व हक्कासाठी लढणाऱ्या नेत्याला उदंड आयुष्य देण्याची प्रार्थना माथाडी कामगारांनी केली.
सन्माननीय अविनाश रामिष्टे साहेब यावेळेस म्हणाले “मी कामगारांच्या हितासाठी व न्याय हक्कासाठी कटिबद्ध आहे. आपण अनेक अडचणीवर मात करून आपल्या सर्वांच्या सहकार्याने संघटना इथपर्यंत पोहोचली. यामध्ये सर्वात जास्त माथाडींचे योगदान आहे. महाराष्ट्रातून आलेल्या सर्व माथाडी कामगारांचे मनापासून आभारी आहे” असे म्हणत अभिष्टचिंतन सोहळ्याची सांगता केली.
महाराष्ट्रातून अनेक राजकीय दिग्गज नेते ,सामाजिक कार्यकर्ते व विविध क्षेत्रातील पदाधिकारी व नागरिकांनी सन्माननीय अविनाश रामिष्टे शुभेच्छा दिल्या.




