टेक केअर ग्लोबल कंपणीमुळे परिसरात दुर्गंधी; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण.
धोकादायक कंपनीस स्थलांतर करण्याची नागरिकांची मागणी.

दैनिक झुंजार टाईम्स
प्रतिनिधी:- पनवेल
दिनांक:- १२-१२-२०२५
खालापूर:- रसायनी येथील दहिवली कोन–सावळा रोडवरील टेक केअर ग्लोबल सर्विसेस या कंपनीतून प्रसारणाऱ्या तीव्र दुर्गंधीमुळे स्थानिक परिसरात मोठ्या प्रमाणात आरोग्यविषयक समस्या निर्माण झाल्याची माहिती समोर येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, या ठिकाणी रसायने व इतर उत्पादनांच्या वाहतुकीसाठी वापरल्या जाणाऱ्या टॅंकची तपासणी, व्यावसायिक देखभाल, दुरुस्ती आणि चाचणी एका विशिष्ट प्रकारे तज्ञांच्या निरीक्षणा खाली केली जात असल्याचे समजते. दररोज शेकडो–हजारो टॅंकची तपासणी केली जात असून त्या प्रक्रिये दरम्यान वापरल्या जाणाऱ्या विविध रासायनिक पद्धतीमुळे परिसरात अस्वस्थ करणारी तीव्र दुर्गंधी मोठ्या प्रमाणात पसरत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
या दुर्गंधीमुळे वयस्क, जेष्ठ नागरिक, लहान मुले तसेच श्वसनाचे त्रास असलेल्या व्यक्तींना श्वास घेण्यास अडचण, डोळ्यांत जळजळ आणि अस्वस्थता जाणवत असल्याचे समजते. त्यामुळे परिसरातील वातावरणात बदल व हवा दूषित झाल्याती तक्रार समोर येत आहे
केमिकल क्षेत्रातील तज्ज्ञांच्या माहितीनुसार, ब्रोमिनसह विविध व्होलाटाईल ऑर्गॅनिक कंपाऊंड्स (VOCs), SO₂, NOx सारख्या रसायनांचा वापर प्रक्रिये दरम्यान होत झाल्यास अश्या प्रकारची दुर्गंधीची तीव्रता वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. प्रवासी किंवा स्थानिक नागरीकांच्या मते मानवी आरोग्यास हानिकारक ठरू शकणारे असे विषारी वायू वातावरणात पसरत असल्याची चिंता व्यक्त केली जात आहे.
या पार्श्वभूमीवर, स्थानिक प्रदूषण नियंत्रण मंडळाने याची गंभीर दखल घेऊन संबंधित प्रक्रियेची तपासणी करावी, नियमांचे उल्लंघन आढळल्यास योग्य ती कारवाई करावी तसेच आवश्यक असल्यास अशा प्रकल्पांचे स्थलांतर रहवासी क्षेत्रा पासून दूर करण्याची मागणी नागरिक व पर्यावरण प्रेमींकडून होत आहे.
या संदर्भात पुढील काळात प्रशासना कडून कोणती उपाययोजना केली जाणार याकडे स्थानिकांचे लक्ष लागून आहे.



