आरोग्य विषयक

पल्लवी युवराज काकडे आयोजित “आरोग्याची वारी, आली आपल्या दारी” अभियानास अभूतपूर्व प्रतिसाद, तब्बल ८०८८ नागरिकांची तपासणी.!

दैनिक झुंजार टाईम्स 

आनंदा धेंडे:- पुणे जिल्हा प्रतिनिधी 

दिनांक:- ०७-१२-२०२५

पुणे:- थेऊरसह परिसरातील आळंदी, कुंजीरवाडी, कोलवडी, मांजरी व आव्हाळवाडी या गावांत सौ. पल्लवी युवराज काकडे यांच्या वतीने, आयोजित केलेल्या महाआरोग्य शिबिरांस नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून, अभूतपूर्व प्रतिसाद दिला आहे.

आळंदी, कुंजीरवाडी, थेऊर, कोलवडी, मांजरी व आव्हाळवाडी या गावांतील एकूण ८०८८ नागरिकांनी शिबिरात सहभाग नोंदवला. यातील ५१८० नागरिकांच्या डोळ्यांची तपासणी केली, यातील ३९२४ नागरिकांना मोफत चेसम्यांचे वाटपात करण्यात आले. तसेच ३८८ नागरिकांना मोतीबिंदूच्या शस्त्रक्रियांचे निदान झाले असून, यातील ८० रुग्णांवर मोतीबिंदूच्या शस्त्रक्रिया पार पडल्या असून, उर्वरीत शस्त्रक्रिया टप्प्या-टप्प्याने सुरू आहेत. तसेच ०९ अपंग बांधवांच्या हात व पायांचे मोजमाप घेऊन, त्यांना काही दिवसात कृत्रिम हात-पाय उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. तसेच ०७ नागरिकांवर कान/नाक/घसा तर काही रुग्णांच्या गुडघ्याच्या शस्त्रक्रिया केल्या जाणार आहेत.

गावोगावी फिरून नागरिकांची विचारपूस करून, त्यांच्या आरोग्याच्या गरजा ओळखून थेट तज्ज्ञ डॉक्टरांच्या सेवा उपलब्ध करून देणारा हा प्रयत्न ग्रामस्थांच्या दृष्टीने अत्यंत मोलाचा ठरला आहे. विशेषतः मोतीबिंदू शस्त्रक्रिया, कृत्रिम अवयव बसविणे, हाडांचे आजार, डोळे व कान-नाक-घसा तपासणी या सेवा एकाच ठिकाणी मिळाल्याने अनेकांना तात्काळ उपचार मिळाले.

पल्लवी युवराज काकडे म्हणाल्या, “शरीर हीच खरी संपत्ती असून, तीचे जतन म्हणजेच आरोग्याची काळजी घेणे, ही काळाची गरज बनली आहे. याचअनुषंगाने सर्वसामान्य नागरिकांना, गावोगावी तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य व सवलतीच्या दरात उपचार करून देऊन, गोरगरीब व सर्वसामान्य कुटुंबांना आधार देणे, हे आमचे ध्येय आहे.

मोठ्या प्रमाणात आरोग्य सुविधा, घरोघरी मिळाल्याने ग्रामस्थांमध्ये समाधानाची भावना असून, या उपक्रमामुळे अनेक नागरिकांचे जीवनमान निरोगी व सुखकर झाले आहे. यामुळे सौ.पल्लवी युवराज काकडे यांच्याबद्दल सहानुभूती निर्माण झाली आहे. या उपक्रमामुळे नागरिकांचे आरोग्य सुधारण्यास मोठा हातभार लागला असून, महाआरोग्य शिबिरांच्या या यशस्वी उपक्रमाकडे, ग्रामीण भागात ‘आरोग्य क्रांतीचे एक नवीन पाऊल’ म्हणून बघितले जात आहे.

थेऊर ग्रामपंचायत सदस्य युवराज हिरामण काकडे यांनी, २०१५ सालापासून, १० वर्षे अविरतपणे हजारो गोरगरीब रुग्णांना केलेल्या वैद्यकीय मदतीमुळे, त्यांना समाजाकडून “आरोग्यदूत” म्हणून संबोधले जाते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button