माहिती तंत्रज्ञान
Trending

राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाच्या वतीने भव्य राज्यस्थरीय कार्यशाळा…

दैनिक झुंजार टाईम्स 

राजपाल शेगोकार:- पनवेल प्रतिनिधी 

दिनांक:- ०१-१२-२०२५

 

वावंढळ, खालापूर (रायगड) – राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ (भारत) तर्फे आयोजित एक दिवसीय राज्यस्तरीय पत्रकार-कार्यशाळा २०२५ तथा एकदिवस स्वतःसाठी हा कार्यक्रम शनिवार, २९ व ३० नोव्हेंबर २०२५ रोजी हॉटेल मेट्रो पॅलेस फॅमिली रिसॉर्ट, वावंढळ येथे उत्साहपूर्ण वातावरणात संघाचे संस्थापक अध्यक्ष विजय सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. या कार्यक्रमाला राज्याच्या कानाकोपऱ्यातून पदाधिकाऱ्यांनी हजेरी लावली होती, हे विशेष!

 

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पेण तालुका अध्यक्ष पत्रकार कैलासराजे घरत यांनी केले. कार्यशाळेची सुरुवात महिला पदाधिकाऱ्यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज, गौतम बुद्ध, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून तसेच भारतीय संविधान उद्देशिका वाचनाने झाली. उद्देशिकेचे सामूहिक वाचन राष्ट्रीय कार्याध्यक्ष बाळासाहेब आढांगळे यांच्या नेतृत्वाखाली पार पडले.

कार्यक्रमाच्या विचार मंच्यावर राष्ट्रीय कार्यकारिणीतील मान्यवर उपस्थित होते. त्यामध्ये राष्ट्रीय कार्याध्यक्ष बाळासाहेब आढांगळे, राष्ट्रीय महासचिव विनोद पवार, राष्ट्रीय उपाध्यक्ष ज्ञानेश्वर बागुल, राष्ट्रीय सल्लागार डॉ. सुरेंद्र शिंदे, राष्ट्रीय संघटक निलेश ठाकरे, राज्य संघटक नरेंद्र सोनारकर, राज्य सचिव (अन्याय अत्याचार समिती) प्रीतमसिंह चौहान, मराठवाडा विभागीय अध्यक्ष मारोती शिकारे आदींचा समावेश होता. सर्व मान्यवरांचा शाल, पुष्पगुच्छ व छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा देऊन सन्मान करण्यात आला.

धुळे, जळगाव, नाशिक व नांदेड जिल्ह्यातील महिला पदाधिकाऱ्यांचा विशेष सामूहिक सत्कार करण्यात आला. कार्यशाळेत पत्रकारितेतील नवतंत्रज्ञान, नैतिकता, सामाजिक जबाबदारी या विषयांवर विविध सत्रे घेण्यात आली.

प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि डिजिटल मीडिया या तीन माध्यमांवर आधारित विशेष मार्गदर्शन झाले. कार्यशाळेचे प्रमुख मार्गदर्शक कांतीलाल कडू (मुख्य संपादक – दैनिक निर्भीड लेख. यांनी पत्रकारांशी प्रश्नोत्तरांचे परिपूर्ण सत्र घेतले. नरेंद्र सोनारकर यांनी संपादकीय व साहित्यिक लेखनाबाबत मार्गदर्शन केले. प्रा. सुशील जाधव यांनी स्तंभलेखन आणि विद्यार्थी मार्गदर्शन विषय हाताळला, तर निलेश ठाकरे यांनी इलेक्ट्रॉनिक मीडिया व डिजिटल पत्रकारितेवर विशेष सत्र घेतले.

संस्थापक अध्यक्ष विजय सूर्यवंशी यांनी अध्यक्षीय भाषणातून पत्रकारितेची जबाबदारी, कर्तव्य व बदलत्या युगातील डिजिटल माध्यमाची गरज यावर प्रकाश टाकला. कार्यशाळेत सहभागी झालेल्या सर्व पत्रकारांना प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.

दुसऱ्या दिवशी ३० नव्होंबर रोजी ‘एक दिवस स्वतःसाठी’ हा प्रेरणादायी उपक्रमाने पत्रकारांना वेगळीच ऊर्जा प्रदान केली.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनात रायगड–ठाणे–मुंबई विभागाचा विशेष वाटा होता. रायगड जिल्हा अध्यक्ष धनाजी पुदाले, कार्याध्यक्ष सचिन गायकवाड, सचिव राजपाल शेगोकार. सहसचिव महेंद्र माघाडे.,संपर्क प्रमुख दत्तु ठोके, संपर्कप्रमुख गणेश पराड, संघटक उमाजी मंडले, सचिन गावंड, सुनील जोशी, प्रवीण नाईक,कामोठे शहर अध्यक्ष अर्जुनराव गवळी, वडाळा शहर मुंबई अध्यक्ष नंदकुमार अहिरे, नवीमुंबई अध्यक्षा आशा ढसाळ. यांनी उत्कृष्ट नियोजन व व्यवस्थापन केले होते.

राष्ट्रगीताने कार्यशाळेची सांगता झाली. राज्यभरातील पत्रकार बांधव, पदाधिकारी व विविध समित्यांचे मान्यवर यांच्या उपस्थितीमुळे राज्यस्तरीय पत्रकार कार्यशाळेला भव्यता प्राप्त झाली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button