डोगराळे येथील मुलीवर अत्याचार करुन खुन करणाऱ्या आरोपीला फाशीच्या शिक्षेची मागणी!

दैनिक झुंजार टाईम्स
राम रत्नपारखे:- लातूर जिल्हा प्रतिनिधी
दिनांक:- २६-११-२०२५

अहमदपूर:- दि २५-११-२०२५ रोज मंगळवार रोजी अहमदपूर शहरातील नागरीकांच्या वतीने तहसीलदार साहेब यांना निवेदन देण्यात आले की.मौजे डोगराळे ता.मालेगाव येथे एका तीन वर्षीय मुलीवर आती प्रसंग करुन खुन करणाऱ्या आरोपीला प्रशासनाने त्वरीत निर्णय घेवुन प्रकरण फास्ट स्टॅग कोर्टात चालवुन फाशीची शिक्षा घावी, त्या आरोपीस कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे. कारण भविष्यात अशी दुर्दैवी घटना घडु नये यासाठी शासनाने कायद्यात बदल करुन आरोपीस ताबडतोब फाशी द्यावी जेनेकरुन यापुढें अशी दुर्दैवी घटना घडणार नाही याची दखल घ्यावी, असे निवेदनात नमुद केले आहे
त्या निवेदनावर रामरत्न पारखे.पाडुरंग लोकरे.संभाजी केंद्रे.विटृलराव करले.अॅड सोमनाथ फुले.चर्तुभुज पाटील. नवनाथ सुरणर. महेश पारडे. हरिप्रसाद पारडे. शुभम पारडे. धिरज लाटकर. शरद मैड. रोहित डाळे. साई मैड. बालाजी करले. प्रवीन महामुनी. प्रमेश्वर कऊटकर. राहुल पाटील. धनाजी कचे. संदिपान शहाणे. अकाश डाळे. सोमेश्वर टाक. किरण ढाळेकर. हरिभाऊ रोडे. मनोज करंडे. सचिन मरेवाड. नवनाथ हांडे तसेच अहमदपूर शहरातील अनेक नागरीकांच्या त्या निवेदनावर सह्या आहेत.




