Uncategorizedअपघात
मुंबई–पुणे द्रुतगती मार्गावर भीषण अपघात; तिघांचा मृत्यू.

दैनिक झुंजार टाईम्स
महेंद्र माघाडे. वार्ताहर
दिनांक २३-११-२०२
पुणे:- मुंबई, आज सकाळी ४ वाजता – मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर आज पहाटे भीषण अपघात झाला. एका ट्रक चालकाने नियंत्रण सुटल्याने लेनमधून बाहेर येत बॅरिकेडस् तोडून मुंबई-पुणे दिशेकडे येणाऱ्या लेनमध्ये घुसखोरी केली. यामध्ये समोरून येणाऱ्या टाटा नेक्सॉन कारला (MH46 CR 4094)जोरदार धडक बसली.
धडकेची ताकद इतकी प्रचंड होती की टाटा नेक्सॉनमधील दोघांचा आणि ट्रक चालकाचा घटनास्थळीच मृत्यू झाला. अपघातानंतर वाहतूक काही काळ विस्कळीत झाली असून पोलिसांनी क्रेनच्या सहाय्याने दोन्ही वाहने हलवून मार्ग मोकळा केला.एक-दोन तासापेक्षा आधिकवेळ मुंबई पुणे एक्स्प्रेस वर वाहतूक कोंडी झाली होती.
या अपघाताचा अधिक तपास महामार्ग पोलिसांकडून सुरू आहे.




