ओबीसी हक्क परिषद नवी दिल्लीच्या किस्किंदा ताई पांचाळ यांची मराठवाडा अध्यक्ष पदी निवड.

दैनिक झुंजार टाईम्स
राम रत्नपारखे:- लातूर जिल्हा प्रतिनिधी
दिनांक:- १९-११-२०२५
नवी दिल्ली:- ओबीसी हक्क परिषद नवी दिल्ली या संघटनेच्या राज्य संपर्क पदी नियुक्ती करण्यात आली असल्याचे गुरुवर्य डॉ, प्रदीप बाबुराव फाले ओबीसी नेते संस्थापक अध्यक्ष तथा राष्ट्रीय अध्यक्ष यांनी कळविले आहे.
याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात गुरुवर्य डॉ, प्रदीप बाबुराव फाले संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष ओबीसी हक्क परिषद दिल्ली यांनी म्हटले आहे की, किस्किंदा ताई पांचाळ यांनी आजपर्यंत ओबीसी समाजाविषयी केलेले काम व समाजातील विविध जाती धर्मातील लोकांना सोबत घेवुन चालण्याची हातोटी याची दखल घेवुन ओबीसी हक्क परिषद नवी दिल्ली ओबीसी समाजाच्या न्यायाच्या हक्कासाठी स्वतंत्र चळवळ या संघटनेच्या मराठवाडा अध्यक्ष या पदावर किस्किंदा ताई पांचाळ यांची नियुक्ती करत आहे. आपल्या संघटन कौशल्याने संघटनेचे कार्य विविध समाज घटकापर्यंत पोहचवाल व संघटना मजबुत कराल. आपल्या सामाजिक कार्याला बळ प्राप्त होऊन आणखी गतीने आपण समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी नेहमी अग्रेसर रहाल अशी अपेक्षा करतो. यावेळेस नियुक्ती देताना गुरुवर्य डॉ. प्रदीप बाबुराव फाले संस्थापक अध्यक्ष, सुदर्शन बोराडे राष्ट्रीय संघटक उपस्थित होते. सर्व ओबीसी समाजातून निवडी बद्दल शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.




