सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार कैलासराजे कमलाकर घरत यांची लातूर नगरी वार्ता- मुंबई विभाग संपादक पदी निवड.
"पत्रकार कैलासराजे घरत यांच्यावर अभिनंदांसह शुभेच्छांचा वर्षाव"..!

दैनिक झुंजार टाईम्स
राजपाल शेगोकार:- पनवेल प्रतिनिधी
दिनांक:- २९-१०-२०१०
मुंबई:- लातूर नगरी वार्ता चे सर्वेसर्वा मुख्य संपादक आदरणीय श्री विशाल वसंतराव सूर्यवंशी साहेब यांच्या आदेशाने आणि मार्गदर्शनाखाली सामाजिक कार्यकर्ते, पुरोगामी पत्रकार संघ पेण तालुका अध्यक्ष पत्रकार कैलासराजे कमलाकर घरत यांची लातूर नगरी वार्ता मुंबई विभाग संपादक पदी निवड करण्यात आली. सामाजिक कार्यकर्ते सन्मानिय कैलासराजे घरत एक उत्तम निर्भिड पत्रकार असून गेली अनेक वर्षे जनसामान्यांच्या समस्यांना, अन्यायाला आपल्या लेखणीच्या पत्रकारितेच्या माध्यमातून वाचा फोडण्याचे, त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी शासन दरबारी सतत प्रयत्नशील असतात. अपघात ग्रस्तांना उपचारासाठी मदत, शासकीय रुग्णालयात दाखल करण्यासाठी सहकार्य करणे, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक दाखले, त्यांचे कार्य हीच त्यांची ओळख बनली आहे. प्रत्येक क्षेत्रात त्यांनी आपल्या कार्याचा ठसा उमटवला आहे. त्यांच्यासारख्या एका कार्यकुशल, हरहुन्नरी, अष्टपैलू व्यक्तिमत्वाची दैनिक लातूर नगरी वार्ता- मुंबई विभाग संपादक पदी निवड झाल्याबद्दल विविध राजकीय, सामाजिक संघटना, भारतीय दलीत साहित्य अकादमी मुंबई, कोंकणदीप परिवार, स्वतंत्र कोकणराज्य अभियान संस्थापक अध्यक्ष संजय कोकरे साहेब, महाक्रांती न्यूज, सारथी न्यूज, जनादेश न्यूज, रायगड स्वाभिमान वृत्तपत्र, पुरोगामी पत्रकार संघ, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ, नवी मुंबई पत्रकार संघ, पत्रकार मित्र, पदाधिकारी यांच्याकडून अभिनंदनासह शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
रायगड स्वाभिमान, जन महाराष्ट्र न्यूज, सारथी न्यूज, पुरोगामी विचारांची झुंज, जनक्रांती न्यूज, दैनिक झुंजार टाईम्स,
आधुनिक केसरी, स्टार वन न्यूज वर्तमानपत्र, परतवाडा टाइम्स, मंडे टाइम्स, महाराष्ट्र वेदभूमी, साप्ताहिक वेध विकासाचा, महाराष्ट्र न्यूज, युथ महाराष्ट्र वृत्तपत्र प्रतिनिधी म्हणून गेली अनेक वर्षे काम करीत असताना समाजातील अनेक समस्यांना वाचा फोडण्याचे, शेतकरी संघटनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांवर होणाऱ्या अन्यायाविरोधात जनजागृती तसेच अनेक मोर्चा उपोषण, धरणे आंदोलन यात सक्रिय सहभाग घेतात.अनेक राज्यस्तरीय सामाजिक संस्थांमध्ये ते सक्रिय कार्यरत आहेत. त्यांच्या पुढील पत्रकारिता आणि सामाजिक वाटचालीस मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा..!




