दुःखद निधन
कै. लक्ष्मण मारुती पाटील (तात्या) यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन.

दैनिक झुंजार टाईम्स
अमोल पाटील:- कराड प्रतिनिधी
दिनांक:-२८-१०-२०२५
कराड:- जिंती तालुका कराड येथील पैलवान दिलीप पाटील यांचे वडील कै. लक्ष्मण मारुती पाटील यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. अगदी सामान्य कुटुंबातील कै. लक्ष्मण मारुती पाटील हे काबाडकष्ट व प्रामाणिक असणारे व्यक्तिमत्व. मुंबईमध्ये छत्रपती शिवाजी महाराज मच्छी मार्केटमध्ये अनेक वर्षे मच्छी व्यवसायात काम करून आपला संसार जिद्दीने करून दाखवला. त्याचबरोबर मुलांचे संगोपन करून दोन मुलींची विवाह करून मुलाला शिक्षण देत पैलवान बनवले. रक्षा विसर्जन कार्यक्रम बुधवार दिनांक २९-१०-२०२५ रोजी सकाळी ९.३० वाजता जिंती तालुका कराड वैकुंठ भूमी येथे होणार आहे.
तात्यांची दुःखद बातमी समजताच सर्वत्र शोककळा पसरली. कराड तालुक्यातील पैलवान ग्रुप व नागरिकांकडून हळहळ व्यक्त होत आहे.




