
दैनिक झुंजार टाईम्स
राम रत्नपारखे:- लातूर जिल्हा प्रतिनिधी
दिनांक:- २५-१०-२०२५
लातूर:- दिनांक २२/१०/२५ बुधवारी मौजे.वरवंटी ता.अहमदपूर जि.लातुर येथे दिपावली पाडवा निमित्त भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा ठेवण्यात आली होती. या स्पर्धेचे उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस तथा माजी सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती शिवानंद तात्या हेंगणे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपस्थित माजी पंचायत समिती सदस्य रामभाऊ नरवटे पाटील, तानाजी राजे, उपस्थित होते…!!
विजेत्या संघाला प्रथम पारितोषिक ₹१११११ पंचायत समिती सदस्य रामभाऊ नरवटे यांच्या हस्ते व
व्दितीय पारितोषिक ₹५५५५ पंचायत समिती सदस्य रामभाऊ नरवटे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.




