इंचगिरी सांप्रदायाचे सिद्धपुरुष ब्रह्मचैतन्य श्री समर्थ सद्गुरु शंकर महाराज रसाळ यांचा समाधी महोत्सव सोहळा मोठ्या थाटात संपन्न!

दैनिक झुंजार टाईम्स
कैलासराजे घरत:- खारपाडा पेण प्रतिनिधी
दिनांक २३-१०-२०२५
सातारा:- इंचगिरी संप्रदायाचे सिद्ध पुरुष श्री समर्थ सद्गुरु शंकर महाराज रसाळ यांचा समाधी उत्सव दिनांक कार्तिक शुद्ध ३, शुक्रवार दिनांक २४/१०/२०२५ ते कार्तिक शुद्ध षष्ठी मंगळवार दिनांक २८/१०/२०२५ या कालावधीत भव्य अशा कार्यक्रमांचे आयोजन, मठाधिपती श्री समर्थ सद्गुरु पांडुरंग महाराज रसाळ यांच्या अधिपत्याखाली संतभूमी तरडगाव जि.सातारा येथे याज्ञिक कार्यानुष्ठान, शास्त्रीयवाक्यर्थ, राष्ट्रीय कीर्तनकार चर्चासत्र, किर्तन, अष्टोत्तरशत नित्य पाठ पारायण, पंचकुंडीय सुदर्शन यज्ञ अनुष्ठान या, अशा विविधअध्यात्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. पाच दिवस चालणाऱ्या या कार्यक्रमासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून गुरु भक्तांचे आगमन संतभूमी येथे होणार आहे. या कार्यक्रमात अनेक नामवंत कीर्तनकारांची कीर्तनरुपी सेवा होणार आहे. पाच दिवस चालणाऱ्या या कार्यक्रमात भक्तांची राहण्याची सोय, नाष्टा, भोजन याची व्यवस्था महाराष्ट्र राज्य रसाळ संप्रदायाचे अध्यक्ष तुकाराम महाराज रसाळ यांच्या अध्यक्षतेखाली. गुरुभक्त व उदार अन्नदाते यांच्या माध्यमातून करण्यात आली आहे. या कार्यक्रमात दिनांक २७/१०/२०२५ रोजी शुद्ध षष्ठीच्या निमित्ताने अनेक राजकीय, आध्यात्मिक, विविध सांप्रदायिक क्षेत्रातील मान्यवर विभूती भेट देणार आहेत. कृपया आपल्याला ज्ञानाची प्राप्ती व्हावी, पारमार्थिक योग्य दिशा मिळावी, आपले जीवन समृद्ध व सुखी व्हावे. म्हणून विद्यावाचस्पती दिनानंदस्वामी यांनी सर्व गुरु भक्तांना या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.गुरुभक्त कृष्णा वर्तक गुरुजी-संप्रदाय कोकण विभाग सचिव




