“एक दिवा वंचितांसाठी” भाजपाचा अभिनय उपक्रम!

दैनिक झुंजार टाईम्स
राम रत्नपारखे:- लातूर जिल्हा प्रतिनिधी
दिनांक:- २२-१०-२०२५
राज्याचे संवेदनशील मुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण यांच्या पुढाकाराने भारतीय जनता पक्षाच्या वतीने “एक दिवा वंचितांसाठी” या उपक्रमांतर्गत राज्यभरातील पाडे, वाडे आणि तांड्यांवर जाऊन भटक्या विमुक्त बांधवांसोबत दिवाळी साजरी करण्यात येत आहे.
भारतीय जनता पक्ष, लातूर शहर जिल्हा यांच्या वतीने लातूर-बार्शी रोडवरील पाड्यावर जाऊन भटक्या विमुक्त बांधवांसोबत दिवाळी साजरी करण्यात आली.
यावेळी भटक्या विमुक्त कुटुंबीयांना दिवाळीनिमित्त फराळ, भेटवस्तू तसेच फटाके वाटप करण्यात आले. याद्वारे समाजातील सर्व घटकांसोबत आनंद वाटण्याचा आणि आत्मीयतेचा सुंदर संदेश देण्यात आला.
या प्रसंगी भारतीय जनता पक्ष हा वंचित, गोरगरीब आणि समाजाच्या शेवटच्या घटकाच्या पाठीशी उभा राहणारा पक्ष असून त्यांच्या प्रगती व उन्नतीसाठी सदैव प्रयत्नशील आहे.
भारतीय जनता पार्टी लातूर शहर चे जिल्हाध्यक्ष अजित पाटील कव्हेकर, सरचिटणीस संजय गिर, निखिल गायकवाड, अस्मिता ताई काटे, मंडल अध्यक्ष विशाल हवा पाटील, सचिन सुरवसे, राहुल भुतडा, युवा मोर्चा अध्यक्ष ओम धरणे, ओबीसी मोर्चा अध्यक्ष प्रमोद गुडे, राजकुमार गोजमगुंडे,अनिल पतंगे, देवा गडदे, विनय जाकते राजू सोनवणे, उदय देशपांडे, उद्योग आघाडीचे संयोजक दयानंद जाधव, गोविंद सूर्यवंशी, संतोष तिवारी, बाळासाहेब शिंदे, गणेश,खाडप, धीरज देशपांडे, शैलेश आदमाने आदि मान्यवर उपस्थित होते.




