कै.सौ.ताईबाई किसन घरत यांचे दुखःद निधन..!

दैनिक झुंजार टाईम्स
कैलासराजे घरत:- खारपाडा पेण प्रतिनिधी
दिनांक:- १९-१०-२०२५
“जो आवडतो सर्वांना, तोची आवडे देवाला.”
उरण:- अष्टगंध कलामंच उरण पूर्व विभाग अध्यक्ष अशोक कान्हा म्हात्रे यांच्या जेष्ठ भगिनी कै.स्वर्गीय ताईबाई किसन घरत यांचे शुक्रवार दिनांक १७/१०/२०२५ रोजी वयाच्या ७८ व्या वर्षी अल्पशा आजाराने बेलपाडा उरण येथे दुःखद निधन झाले आहे. त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना.
ईश्वर त्यांच्या कुटुंबियांना या दुःखातून सावरण्याचे बळ देवो. त्यांच्या मागे त्यांना दोन मुले आहेत. मोठा मुलगा रवींद्र किसन घरत हा एक उत्कृष्ट नाट्य कलाकार आहे. छोटा मुलगा सुहास किसन घरत तसेच सुना, नातवंड, पतवंड असा मोठा परिवार आहे.
त्यांचा दशक्रिया विधी तीर्थक्षेत्र वल्डेश्वर बेलपाडा उरण येथे रविवार दिनांक २६/१० /२०२५ रोजी येथे होणार आहे. उत्तरकार्य विधी मंगळवार दिनांक २८/१०/२०२५ रोजी त्यांच्या राहत्या घरी म्हणजे बेलपाडा उरण येथे होणार आहे. सर्व नातेवाईकांना नम्र विनंती की कोणत्याही प्रकारचे दु:खवटे स्वीकारले जाणार नाहीत याची नोंद घ्यावी.भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण.




