“भारतीय बौद्ध महासभा आणि एक वही एक पेन यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांना शालेय वस्तू वाटप”

दैनिक झुंजार टाईम्स
राजपाल शेगोकार:- प्रतिनिधी
दिनांक:- १६-१०-२०२५

पारनेर:- चिंचोली गावातील विद्यार्थ्यांना भारतीय बौद्ध महासभा आणि एक वही एक पेन अभियानाच्या संयुक्त विद्यमाने शालेय वस्तूंचे वाटप करण्यात आले. तसेच भारतीय बौद्ध महासभेकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची आकर्षक प्रतिमा शाळेला भेट देण्यात आली.
चिंचोली गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत दीवाळीच्या सुट्टीचा शेवटच्या दिवशी भारतीय बौद्ध महासभेचे संघटक सिताराम लव्हांडे यांच्या पुढाकाराने संघटनेच्या वतीने शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय वस्तू वाटप करण्यात आले. तसेच शाळेच्या शिक्षिका श्रीमती. संगीता औटी यांना भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आकर्षक प्रतिमेची भेट दिली.
विद्यार्थ्यांचे प्रबोधन करताना पवार सरांनी कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या कार्यावर प्रकाश टाकला. संत गाडगे बाबा यांनी शिक्षणाप्रती दिलेला लोकांना संदेश आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानतून दिलेल्या अधिकार आणि मूलभूत शिक्षणाविषयी थोडक्यात सांगितले.
या छोटेखानी कार्यक्रमाचे उद्दिष्ट महत्वाचे आणि मोठे आहे. शिक्षण समितीवर लायक माणसं असली पाहिजे असे समाजसेवक भगवान खुपटे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. बौद्ध महासभेचे सिताराम लव्हांडे यांनी विद्यार्थ्यांना थोडक्यात शिक्षणाचे महत्व सांगितले.
माजी सरपंच आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष योगेश झंझाड यांनी शाळेतील विद्यार्थ्यांच्या कमी झालेल्या पटसंख्येविषयी चिंता व्यक्त करत शाळेच्या भूतकाळातील आठवणींना उजाळा दिला. आजच्या या परिस्थितीला आपण सर्व दोषी असल्याचे कथन करत यापुढे शाळेला पूर्वीसारखे वैभव आणण्याची ग्वाही दिली. तसेच काही ग्रामस्थांनी त्यांच्या मुलांना आपल्या शाळेत दाखल करत आदर्श उभा केल्याचे मत व्यक्त केले.
कार्यक्रमाला एक वही एक पेन अभियानातर्फे विक्रांत लव्हांडे, बौद्ध महासभेचे तालुकाध्यक्ष संपत पवार, बाबाजी वाघमारे, सुखदेव थोरात, समाज सेवक भगवान खुपटे, आर पी आयचे किरण शिंदे, शालेय व्यवस्थापक जयदीप पिंपरकर, मा. सरपंच बाळासाहेब झंझाड, मा.सरपंच रामदास मते, मा.चेअरमन बंशी सातपुते, विठ्ठल पिंपरकर, देवराम भगत, सिद्धार्थ सीताफळे, पांडुरंग उबाळे, श्री.थोरात, संतोष उघडे, सिद्दुबा सीताफळे, आदी ग्रामस्थ उपस्थित होते. तसेच कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बौद्ध महासभेचे ग्रामीण शाखेचे पदाधिकारी दुष्यंत सीताफळे, गौरव उघडे, रोहित लव्हांडे, प्रशांत उघडे, साहिल लव्हांडे, मयंक लव्हांडे, प्रतीक लव्हांडे, भावना उघडे, शांता लव्हांडे , रंजना लव्हांडे, इत्यादीने मेहनत घेतली. कार्यक्रमाचे सूत्र संचालन चंद्रकांत मोढवे सरांनी केले व शिक्षिका संगीता कोल्हे औटी यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यात विशेष मेहनत घेतली.
विक्रांत
8591440420




