नवसाला पावणारी उलवेची महाराणी नवरात्रोत्सवात आकर्षक देखावे. शिवसंघर्ष प्रतिष्ठान उलवे तर्फे भव्य आयोजन.

उलवेची महाराणी नवरात्रोत्सव साजरा करणारे शिवसंघर्ष प्रतिष्ठान चे अध्यक्ष व संस्थापक मा. अखिलदादा यादव यांची धावती मुलाखत.
दैनिक झुंजार टाईम्स
वार्ताहर : महेंद्र माघाडे, नवी मुंबई
दिनांक:- ०१-१०-२०२५
नवी मुंबई : उलवेतील नवसाला पावणारी उलवेची महाराणी हा नवरात्रोत्सव हा शहरातील अत्यंत सुप्रसिद्ध उत्सव मानला जातो. देवीचे नवस पूर्ण होतात, या विश्वासामुळे लांबून-लांबून भाविक दर्शनासाठी येथे येतात.
शिवसंघर्ष प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष मा. अखिलजीदादा यादव यांनी २०१९ पासून सातत्याने हा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करण्याची परंपरा जपली आहे. प्रत्येक वर्षी आकर्षक देखावे हे या उत्सवाचे विशेष आकर्षण ठरतात. यंदा किल्ल्याचा देखावा उभारण्यात आला असून मध्यभागी सिंहासनावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा स्थापित केला आहे. आजूबाजूस मावळ्यांचा जीवनपट साकारण्यात आला आहे.
या नवरात्रोत्सवाला मा. प्रितम म्हात्रे यांच्यासह विविध मान्यवर, सेलिब्रिटी, पत्रकार तसेच यूट्यूबवरील नामवंत व्यक्तींची उपस्थिती लाभली आहे.
शिवसंघर्ष प्रतिष्ठान तर्फे देवीभक्त व गरबा रसिकांसाठी लकी ड्रॉ, आकर्षक बक्षिसे तसेच आरोग्य शिबिरे आयोजित करण्यात आली आहेत, अशी माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष व संस्थापक मा.श्री. अखिलजीदादा यादव यांनी दिली. प्रतिष्ठानतर्फे शिवजयंती व गणेशोत्सव देखील मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरे केले जातात.




