वयस्क आणि लहान मुलं झाली थंडी तापाच्या साथीचे शिकार.

दैनिक झुंजार टाईम्स
मुंबई प्रतिनिधी
मुंबई, दि.२७_ मुंबईतील बहुतेक ठिकाणी साथीचे आजाराने तोंड वर काढल्याचे दिसून येत आहे. या वायरल आजारामध्ये थंडी आणि तापाचे लक्षण मुख्यतः पाहण्यास मिळत असून याचे लहान मुलं आणि वयस्क माणसं शिकार होत आहेत.
वातावरणातील बदलाचे परिणाम मानवी आरोग्यावर मोठ्या प्रमाणात होत असल्याचे दिसून येत आहे. सध्या अनियमीत होणाऱ्या पावसामुळे मुंबईतील वेगवेगळ्या भागात साथीच्या रोगाने डोके वर काढले असून डॉक्टरांच्या दवाखान्यात रुग्णांची गर्दी वाढली आहे. एक ते दहा वर्षाची मुले या वायरल थंडी तापामुळे मोठ्या प्रमाणात आजारी पडली असून याचा परिणाम त्यांच्या रोजच्या आयुष्यावर दिसून येत आहे.
भायखळ्यामध्ये थंडी तापाची साथ चालू असून यामुळे लहान मुलं मोठ्या प्रमाणावर आजारी पडले आहेत. पालिका प्रशासनाने योग्य ते पाऊले उचलावीत. सध्या पालकांमध्ये चिंतेचे वातावरण असल्याचे सामाजिक कार्यकर्ते इस्तियाक शेख यांनी सांगितले.



