विश्वकर्मीय समाज समन्वय समिती अहमदपूरच्या वतीने निवेदन सादर!

दैनिक झुंजार टाईम्स
राम रत्नपारखे:- लातूर जिल्हा प्रतिनिधी
दिनांक:- २४-०९-२०२५
लातूर:- विश्वकर्मीय समाज समन्वय समिती लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुका यांच्या वतीने दिनांक २४/०९/२५ रोजी ठीक ११ वाजता मा तहसीलदार अहमदपूर यांना खालील मागण्या संदर्भात निवेदन देण्यात आले.
प्रमुख मागणी भारतीय संविधानाच्या कलम ३४० अंतर्गत दोन ऑक्टोबर २०१७ रोजी महामहीम राष्ट्रपतीच्या मान्यतेने दिल्ली उच्च न्यायालयाचे निवृत्त प्रमुख न्यायाधीश जी रोहिणी यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या आयोगाचा इतर मागासवर्गीय जातीच्या उप वर्गीकरणाचा मसुदा अहवाल सन २०१९ मध्ये पूर्ण झाला असून, तो लवकरात लवकर स्विकारुन इतर मागासवर्गीय जातीचे १, २, ३, आणि ४ या अ,ब,क,ड,उपवर्गामध्ये विभाजन करण्यात यावे. निवेदन श्रीहरी तुकाराम पांचाळ प्रमुख समन्वयक अहमदपूर बालाजी मधुकर पांचाळ तालुका अध्यक्ष शिरूर ताजबंद राजू तुकाराम पांचाळ, बेलूर श्रीराम सोपानराव पांचाळ, हिप्परगा का, सूर्यकांत मारुतीराव पांचाळ महादेव वाडी, सोमनाथ विश्वनाथ पांचाळ, शिरूर ताजबंद बालाजी अरुण पांचाळ, गोविंद सदाशिव पांचाळ, पंकज ज्ञानोबा पांचाळ अहमदपूर, राम हनुमंत पांचाळ टाकळगाव का, गणेश विठ्ठल पांचाळ शिरूर, भास्कर ससुराल पांचाळ नांदुरा बुद्रुक, श्रीकृष्ण वामनराव पांचाळ अहमदपूर, रमाकांत नरहरी पांचाळ अहमदपूर व सर्व अहमदपूर तालुक्यातील विश्वकर्मीय समाज बांधव यांच्या उपस्थितीत निवेदन देण्यात आले




