रॅली/ मोर्चा
आज लातुर तहसील कार्यालय येथे धनगर समाजाच्या एसटी अनुसूचित जमातीच्या आरक्षणाची अंमलबजावणी करण्यात यावी या मागणीचे निवेदन देण्यात आले.
धनगर समाजाच्या एसटी अनुसूचित जमातीच्या आरक्षणाची अंमलबजावणी करण्यात यावी या मागणीचे निवेदन लातुर तालुका व शहर लातुर सकल धनगर समाज बांधवांच्या वतीने देण्यात आले याप्रसंगी समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दैनिक झुंजार टाईम्स
राम रत्नपारखे:- लातूर जिल्हा प्रतिनिधी
दिनांक:- २२-०९-२०२५
जालना:- जालना येथे धनगर समाजाच्या एसटी अनुसूचित जमातीच्या आरक्षणाची अंमलबजावणी करण्यात यावी या मागणीसाठी आमरण उपोषणाला गेल्या पाच दिवसापासून दिपक भाऊ बोराडे बसलेले आहेत त्यांची तब्येत अतिशय हरवली असून त्यांच्या समर्थनार्थ राज्यांमध्ये सर्वत्र निवेदन तहसील कार्यालय जिल्हाधिकारी कार्यालय यांना सादर केलेले आहेत त्याच अनुषंगाने..
२४ सप्टेंबर रोजी जालना येथे धनगर समाजाच्या अनुसूचित जमातीच्या आरक्षणाची तात्काळ अंमलबजावणी करण्यात यावी या मागणीसाठी राज्यभरातील धनगर समाजाच्या वतीने जालना जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाचा आयोजन केलेलं आहे तरी समाज बांधवांनी लाखोच्या संख्येने उपस्थित राहावे असे देखील माध्यमांना बोलताना व्यक्त केले..





