थेऊर येथील पुरपरिस्थितीस कारणीभूत ठरल्याप्रकरणी ६ जणावर गुन्हा दाखल!

दैनिक झुंजार टाईम्स
अनंदा धेंडे:- पुणे प्रतिनिधी
दिनांक:- २१-०९-२०२५
पुणे:- मागील चार दिवसापूर्वी थेऊर (ता. हवेली) येथे मुसळधार पाऊस पडला होता. या पावसामुळे परिसरात पूरस्थिती निर्माण झाली होती. तर या पुरात शेतमालाचे व पशुधनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. ओढे, नाले, मोऱ्या बुजवून नैसर्गिक स्त्रोत कायमस्वरूपी बंद केल्याने पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. या पूरपरिस्थितीस कारणीभूत ठरल्याप्रकरणी शिक्षण सम्राट प्रसादराव पाटील यांच्यासह ६ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत महसूल विभागाच्या या कारवाईमुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.
प्रसाद दत्ताजीराव पाटील, दिलीप कुंजीर, दत्तात्रय महादेव चव्हाण, सुषमा महेश थोरात (सर्व रा. थेऊर ता. हवेली, जि. पुणे), गोविंद जिवन उत्तमचंदानी व राजेश जीवन उत्तमचंदानी (दोघेही रा. सिस्का हाऊस, प्लॉट नं. 89 ते 91 लेन नंबर 4, स. नं. 232/1/2, एअरपोर्ट रोड, साकोर नगर, लोहगाव, पुणे) अशी गुन्हा दाखल करण्य आलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी अर्जुन नागनाथ स (वय 37, रा. फ्लॅट नंबर एन. 304, झेड रेसिडेन्सी, वाघ ता. हवेली, जि. पुणे) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अर्जुन स्वामी हे मौजे कोलवडी (ता. हवेली) येथे ग्राम महसूल अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. परतीच्या पावसामुळे थेऊर फाटा ते थेऊर रस्त्यावरील कांबळे वस्ती व रुकेवस्ती परिसरात पूरसदृश परिस्थिती सोमवारी (ता.15) निर्माण झाली होती. प्रसादराव पाटील यांनी थेऊर ग्रामपंचायत हद्दीतील गट नंबर 63 मध्ये त्यांच्या क्षेत्रालगत संरक्षण मिल बांधल्याने ओढ्याचे पात्र अरुंद झाले आहे.
अतिवृष्टीदरम्यान पावसाचे पाणी ओढ्यावाटे वाहून जाण्यास अडथळा निर्माण होवुन परिसरामध्ये नैसर्गीक आपत्ती व पुरपरिस्थिती निर्माण झाली. अशी तक्रार लोणी काळभोरच्या अपर तहसिलदार तृप्ती कोलते पाटील यांच्या तर्फे प्राधिकृत अधिकारी म्हणुन अर्जुन स्वामी य लोणी काळभोर पोलीस ठाण्यात दिली आहे. त्यानुसा सहाही जणांच्या विरोधात भारतीय न्याय संहिता कलम 270, 125,324(4), 293, 3 (5) आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 चे कलम 51, 53 पर्यावरण संरक्षण अधिनियम 1986 चे कलम 7 व 15 प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पुढील तपास लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ नाळे करीत आहेत.




