वाढदिवसाच्या शुभेच्छा

लग्नाचा सुवर्णमहोत्सव व वाढदिवस सोहळा उत्साहात साजरा!

दैनिक झुंजार टाईम्स

महेंद्र माघाडे:- नवीमुंबई प्रतिनिधी

दिनांक:- २०-०९-२०२५

नवीमुंबई, खारघर : जनार्दन लाखन व मालती लाखन यांच्या लग्नाचा सुवर्णमहोत्सव (५०वा वर्धापनदिन) तसेच जनार्दन लाखन यांचा ७३वा वाढदिवस सोहळा नातेवाईक, मित्रपरिवार व मान्यवरांच्या उपस्थितीत यशस्वी हॉटेल, खारघर येथे दिमाखात साजरा करण्यात आला.

हलाखीच्या परिस्थितीतही कष्टाच्या जोरावर प्रगती साधणारे जनार्दन लाखन यांनी १९७५ साली, मालती यांच्याशी विवाह केला. त्यांना दोन मुले व दोन मुली असून कुटुंब सुशिक्षित व सुसंस्कृत आहे. सध्या ते सम्यक सामाजिक संस्था व समाज समता संघा चे कार्याध्यक्ष आहेत.

या सोहळ्याला समाज समता संघाचे अध्यक्ष अर्जुनराव गवळी, सचिव महेश साळवी, माजी नगरसेविका लीना गरड, भाजपा शहर उपाध्यक्ष व मा. उपसरपंच संजय घरत, राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ रायगड जिल्हा सहसचिव व दैनिक झुंजार टाईम्सचे पत्रकार महेंद्र माघाडे यांच्यासह नातेवाईक मित्र व मान्यवर नेते उपस्थित होते.

मा.संजय घरत यांनी जनार्दन लाखन यांच्या उत्तम आरोग्याचे कौतुक करत १०० वा वाढदिवसही मोठ्या उत्साहात साजरा करू, असे सांगितले. तर अध्यक्ष अर्जुनराव गवळी यांनी काॅफर्ड मार्केट येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामांतर चळवळीतील त्यांच्या योगदानाची आठवण आपल्या भाषणात करून दिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button