अपरिचित इतिहास
लेंडेगाव येथे मराठवाडा मुक्तिसंग्रामदिन उत्साहात साजरा.

दैनिक झुंजार टाईम्स
राम रत्नपारखे:- लातूर जिल्हा प्रतिनिधी
दिनांक:- १९-०९-२०२५
लातूर:- मौजे.लेंडेगाव ता.अहमदपूर येथे ७७ वा मराठवाडा मुक्तिसंग्रामदिनानिमीत्त ध्वजारोहन सोहळा पार पडला.ग्रामपंचायतच्या सरपंच सौ.विद्या रमेश कांबळे यांच्या हस्ते ध्वजारोहन झाले.यावेळी जि.प.प्रा.शाळेतील विद्यार्थी,मुख्याध्यापक,शिक्षक,अंगणवाडी ताई, वि.का.से.स.सोसायटीचे चेअरमन व्हा. चेअरमन यांच्यासह गावातील प्रतिष्ठित नागरीकांची उपस्थिती होती.




