नवीन पनवेल वाहतूक शाखेच अपयश ; वाहतूक कोंडीने प्रवासी व स्थानिक ग्रामस्थ त्रस्त.

दैनिक झुंजार टाईम्स
पनवेल प्रतिनिधी
दिनांक:- १६-०९-२०२५
CFS नियम न पाळणाऱ्यां केरी इंडेव्ह लॉजीस्टिक सारख्या सर्व कंटेनर फ्रट स्टेशनचे परवाना रद्द करा ………
साबीर शेख
पनवेल(दि.१६ ):- दळणवळण ,वाहतूक ,व्यवसाय करताना सोयी, सुविधा, सुरक्षेची सर्वस्वी हमी देणाऱ्या विविध अटी, शर्ती धोरणांना डावलीत पळस्पे ,कोन ते सोमटणे ,नारपोली रस्त्यावरील केरी इंडेव्ह सारख्या विविध कंटेनर फ्रट स्टेशनच्या बेकायदेशीर रस्त्यावरील वाहतूक कोंडी मुळे दररोज हजारो प्रवासी वर्ग व स्थानिक ग्रामस्थ अनेक वर्षांपासून त्रस्त झालेले पाहायला मिळत आहे . याचाच दुर्दैवी अनुभव दि.१५ सप्टेंबर रात्री ०८ वाजल्यापासून ते दुसऱ्या दिवशी सकाळी ०९ वाजता हि प्रवाश्यांनी दुःखी मनानं अनुभवला .नवल म्हणजे कोन ट्रॅफिक निवारा चौकी पासून होंडा ते केरी इंडेव्ह लॉजिस्टिक मधील सर्व यार्ड मध्ये जाणाऱ्या शेकडो ट्रेलर ट्रक ने मुख्य रस्त्यालाच पार्किंग बनवून ठिया मांडला होता . त्यामुळे नागरीक जीव मुठीत धरून आपली वाहने त्यातून मार्ग काढत होती त्या ठिकाणी मात्र फक्त एक खाकी वर्दीतील पोलीस कर्मचारी युद्धपातळीवर शक्य त्या सर्व ताकतीने वाहतूक नियंत्रित करताना दिसत होता . नवीन पनवेल वाहतूक विभाग मात्र या विषयापासून गाफील अवस्थेत पाहायला मिळाला. प्रशासन हाताशी धरून दररोज सर्रासपणे वाहतूक अडचण करणारे माजोर कंटेनर फ्रट स्टेशन लॉजीस्टिक व्यवस्थापन यावेळी ती पहिली जवाबदारीच नसल्याचे समजून सर्व गोंधळ उघडया डोळ्याने बघत होते. खाकितील एक योध्दा व स्वतः प्रवासी ,पत्रकार या धर्मसंकटात अडाणी अशिक्षित बेजबाबदार ट्रेलर ट्रक वाल्यांना विनवण्या करत मार्ग मोकळा करून वाहतूक नियंत्रण करत होते . अनेक किलोमीटरची प्रचंड मोठी वाहतूक कोंडीच्या मागील प्रमुख कारण पाहिले असता CFS धोरण न पाळणारे लॉजीस्टिक अधिकारीच असल्याचा आरोप त्या ठिकाणी उपस्थित पत्रकार साबीर शेख यांनी केले .आणि म्हणाले की स्थानिक ग्रामस्थांच्या कडून माहिती मिळाते की कथित आर्थिक हित संबंधामुळे यावर आज पर्यंत तोडगा निघत नाही. यांना अनेक वेळा क्रियाशील पत्रकार संघटनेच्या माध्यमातून निवेदन सुद्धा दिले आहे .हे खऱ्या अर्थाने वाहतूक विभागाचे हे मोठे अपयश समजले जात आहे. यावर अंतिम पर्याय म्हणजे येथील CFS ने लॉजीस्टिक नियमानुसार यार्ड चे पार्किंग तपासून त्यांना वर्क ऑर्डर द्यावी ,पार्किंग व त्यात सोयी सुविधा नसल्यास यार्डचे उद्योग परवाने कायमस्वरूपी रद्द करावे किंवा दुसरीकडे स्थलांतरित करण्यात यावे .
बेकायदेशीर पार्किंग मुळे वाहतूक अडचण होते , ड्राइवर वर्ग रस्त्यावर उघड्यावर शौच करतो ,बेकायदेशीर धाब्यावर ट्रक थांबवतो , बेजबाबदार अस्वच्छता पसरवतो , वावरतो, धाबे साचलेला सांडपाणी रस्त्यावर फेकतात, बेकायदेशीर मद्य व नशा युक्त पदार्धांचे खुलेआम सेवन करताना ते दिसतात तर अश्या अनेक गोष्टींमुळे रस्त्यावर स्थानिक वावरताना रात्री बेरात्री कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असतो . तर पेन ठिकाणी असलेल्या jsw कंपन्या मधील कर्मचारी वर्गासाठी असलेल्या अनेक बस रस्त्यावरच आपल्या गाड्या लावून पार्क केलेल्या असतात असा सर्वांवर गैर कारभार चालवण्यासाठी काही समाज कंटकांचा, हफ्ते खोरांचा आर्थिक छुपा गैरव्यवहार चालत असतो.परिणामी हप्ते देऊन सर्रासपणे वाहन चालक, ट्रान्सपोर्ट वर्ग वाहतुकीस अडथळे निर्माण करताना दिसत असतो.
गाव,खेडे,रहवासी सोसायटी,औद्योगिक वसाहत ,शाळेत,दवाखान्यात,कामावर जाणारे अनेक लाखो नागरीक या त्रासामुळे येत जात ट्राफिक पोलिसांना दोष देत असतात.
वाहतुक अडचण करणारी केरी इंडेव्ह लॉजिस्टिकचा विशेष काही उल्लेख नागरीक व तिथे येणारे ट्रान्सपोर्टर ,ट्रक वाहक करताना दिसतात. कारण ज्यूड यांचे म्हणे की “सगळे कंटेनर यार्ड रस्त्यावर बेकायदेशीर ट्रक उभे करतात तर आमच त्यात नवल काय ..”या वर असे समजते की पोलीस वाहतूक नियंत्रण विभाग या सर्व विषयाकडे जाणीवपूर्वक पाठ फिरवून फक्त औपचारिकता म्हणून महसुली दंड जमा करण्याच्या उद्देशाने कार्य करत आहे की काय असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होतो. राज्यातील प्रमुख अनेक लोकप्रिय व सर्वात अधिक वितरण होणाऱ्या वृत्तपत्रांनी आपल्या बातम्यातुंन या विषयाची दखल घेतली मात्र यावर निर्लज्ज पणे बघ्याच्या भूमिकेत प्रशासकीय व्यवस्था हातावर हात ठेवून सर्व सामन्य जनतेला वेटीस धरून उभी आहे. भविष्यात अश्या अडचणी मुळे प्रशासनाला जनतेच्या अक्रोशाला सामोरे जावे लागेल व वाहतूक अडचणी साठी सदैव आवाज उठवणारा वर्ग सामूहिक पणे आंदोलन ,उपोषण, मोर्चा सारख्या विरोधातुंन पनवेल पत्रकार संघटनेच्या सोबत तेथील लॉजिस्टिक यार्ड समोरील रस्ता रोको करून निर्देशन करेल अशी संतप्त प्रतिक्रिया पत्रकार साबीर शेख यांनी माध्यमांना दिली.




