हवामान

हवामानखात्याचा इशाराः मुंबईसह कोकणात मुसळधार पावसाची शक्यता!

दैनिक झुंजार टाईम्स

उमाजी मंडले:- पनवेल प्रतिनिधी 

दिनांक:- १४-०९-२०२५

महाराष्ट्र:- मे महिन्यात सुरू झालेला पाऊस अजून थांबला नाही. त्यातच आज कोकणात आज मुसळधार पावसाचा अंदाज असून रायगडसाठी ‘ऑरेंज’ तर मुंबई, ठाणे, नवी मुंबई व पालघरसाठी ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपासून हलका पाऊस आणि उकाड्यानंतर अचानक पावसाची तीव्रता वाढली आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग येथे अत्यधिक पावसाचा संभव आहे. रस्ते व खालच्या भागांत पाणी साचण्याची शक्यता असून नागरिकांना खबरदारीचे आवाहन करण्यात आले आहे. वाहतूक व दैनंदिन व्यवहारांवर याचा परिणाम होऊ शकतो. महत्त्वाचं काम असेल तरच बाहेर पडावे असे आवाहन हवामान खात्याने केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button