सण उत्सव
पारंपारिक ढोल ताशांच्या गजरात श्री दत्त गणेश मंडळाच्या बाप्पाचे विसर्जन.

दैनिक झुंजार टाईम्स
अमोल पाटील:- कराड प्रतिनिधी
दिनांक:- ०९-०९-२०२५
कराड:- सवादे तालुका कराड जिल्हा सातारा येथील श्रीदत्त गणेश व नवरात्र उत्सव मंडळ सवादे येथे डॉल्बी सारख्या वाद्याला फाटा देत मंडळांनी यावर्षी ढोल ताशांच्या गजरात गणपती बाप्पाचे मिरवणूक काढली. अनेक तरुण-तरुणी या मिरवणुकीत सहभागी झाले होते.”गणपती बाप्पा मोरया”या जयघोषाने पवारवाडी, सवादे गावात बाप्पाचा आवाज दुमदुमला. ढोल ताशांच्या वाजत गाजत मिरवणुकीमुळे नागरिकांनी कौतुक केले. उंडाळे परिसरातील मंडळांना यामुळे वेगळा संदेश देण्याचा प्रयत्न श्री दत्त गणेश व नवरात्र उत्सव मंडळ पवारवाडी सवादे यांनी केला आहे.




