भर पावसात लालबागचा राजा विसर्जना वेळी पाय वाळूत का रुतला?

दैनिक झुंजार टाईम्स
अमोल पाटील:- मुंबई प्रतिनिधी
दिनांक:- ०९-०९-२०२५
मुंबई :- सन १९३४ मध्ये कोळी बांधवांनी लालबागच्या राजाची स्थापना केली. लालबाग मधील गिरणी कामगारांनी, कोळी बांधवांनी बाजारपेठेसाठी गणपतीला प्रार्थना केली. गणपती नवसाला पावल्यामुळे लालबागचा राजा जगभर प्रसिद्ध झाला. अनेक भाविकांच्या इच्छा पूर्ण झाल्यामुळे भक्तांची गर्दी वाढू लागली. खऱ्या अर्थाने कोळी बांधवांचा मोठा सहभाग ७० वर्षापासून होता. पण वीस वर्षापासून कोळी बांधाचा बांधवांचा सहभाग नाही. त्याचबरोबर गिरणी कामगार, कोळी बांधव, मराठी बांधव खऱ्या अर्थाने यांचाच लालबागचा राजा आहे.
मराठा आंदोलन मोर्चा २९ ऑगस्ट रोजी मुंबई येथे धडकला त्यावेळी लालबाग अन्नछत्र त्यांच्यासाठी बंद केले. कोळी बांधवांना लालबागच्या राजाच्या मंडळ सहभाग नाही. सामान्य माणसाला रांगेत उभे राहून पायावर डोके ठेवले की क्षणात बाजूला करतात आणि नेतेमंडळी, व्हीआयपी मंडळी ,कलाकार यांना पुरस्कार देऊन सन्मानित केले जाते. कदाचित यामुळे लालबागचा राजा वाळूत पाय राहून बसला होता.
लालबागचा राजा विसर्जनासाठी पोहोचला. दरवर्षी अनंत चतुर्थीला होणारे विसर्जन पौर्णिमेच्या दिवस उजाडला. ३४ तासानंतर राजाची विसर्जनास सुरुवात झाली. पावसाने थैमान घातले होते. गुजरात वरून इलेक्ट्रॉनिक बापाच्या विसर्जनासाठी आणली होती. पण पावसाच्या आणि समुद्राच्या लाटा पुढे टिकली नाही. अनेक सामान्य गणेश भक्तांनी गणपती बाप्पा चुकले असेल तर माफ कर अशी हात जोडून विनंती केल्यानंतर शेवटी कोळी बांधवांनी यांनी विसर्जन केले. यापुढे लालबागच्या राजाच्या मंडळांनी बोध घेतील काय? असा प्रश्न गणेश भक्तांच्या मनात निर्माण होत आहे.




