“पालक मंत्री आपल्या दारी” शंभूराजे देसाईंच्या या अभिनव उपक्रमाला जनतेचा प्रचंड प्रतिसाद.

दैनिक झुंजार टाईम्स
अमोल पाटील:- पाटण प्रतिनिधी
दिनांक:- ०८-०९-२०२५
काही दिवसापूर्वीच अष्टपैलू व्यक्तिमत्त्व मंत्री शंभूराजे यांनी पालकमंत्री आपल्या दारी अभिनव उपक्रम महाराष्ट्र मध्ये पहिल्यांदा पाटणमध्ये शुभारंभ करण्यात आला.
या कार्यक्रमात शंभूराजे देसाई म्हणाले महाराष्ट्र राज्यात प्रथमच आपल्या जिल्ह्यात पालकमंत्री आपल्या दारी या अभिनव उपक्रम राबवला जात आहे. हा उपक्रम अत्यंत शिस्तबदपणे व शास्त्रशुद्ध पद्धतीने राबवला जाईल राज्यासाठी तो आदर्शवत ठरेल. यासाठी सर्व शासकीय यंत्रणा आवश्यक ते सहकार्य करेल.
सामान्य जनतेचे प्रश्न तसेच शासकीय कामातील अडचणी आपल्या कागदपत्रासह पालकमंत्री कार्यालयातील समन्वयाकडे द्याव्यात त्यामुळे जलद गतीने तक्रारी निवारण लवकर होईल. शासकीय कामात अडचण आल्यास त्यातून मार्ग काढला जाईल.
पाटण मतदारसंघातील मतदारांच्यामुळे निवडून दिल्याने आम्ही मंत्री झालो. या मतदारसंघाची माझे जिव्हाळ्याचे नाते आहे लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या तत्त्वावर व विचारावर आपले कार्य सुरू आहे. शासन आपल्या दारी या उपक्रमाचा सर्वांनी उपयोग करून घ्यावा जेणेकरून सामान्य जनतेचे प्रश्न मार्गी लागले आहेत.
पालकमंत्री आपल्या दारी योजनेचे फायदे
१.नागरिकांचा थेट संवाद – लोकांना आपल्या समस्या सांगण्यासाठी कार्यालयीन फेऱ्या माराव्या लागत नाहीत, तर थेट पालकमंत्र्यांशी संवाद साधता येतो.
२.प्रशासन लोकांपर्यंत पोहोचते – सामान्यतः लोकांना शासन कार्यालयात जावे लागते; या योजनेत शासन व प्रशासन स्वतः लोकांच्या गावी पोहोचते.
३.तक्रारींचे त्वरित निराकरण – लोकांच्या तक्रारी, मागण्या आणि प्रश्न यांची त्वरित नोंद घेऊन त्यावर तातडीने कार्यवाही करण्याची सोय होते.
४.पारदर्शकता व जबाबदारी – अधिकारी व प्रशासनाला थेट लोकांसमोर जबाबदारी पार पाडावी लागते, ज्यामुळे पारदर्शकता वाढते.
५.स्थानिक विकासाला गती – गावोगावी प्रत्यक्ष पाहणी होऊन रस्ते, पाणी, वीज, शाळा, आरोग्य अशा मूलभूत सुविधांवर त्वरित निर्णय घेता येतात.
६.नागरिकांचा आत्मविश्वास वाढतो – लोकांना शासन त्यांच्या सोबत उभे आहे याचा विश्वास निर्माण होतो.




