गोकुळच्या राज्याचे धुमधडाक्यात विसर्जन.

दैनिक झुंजार टाईम्स
अमोल पाटील:- पनवेल प्रतिनिधी
दिनांक:- ०७-०९-२०२५
आजवली तालुका पनवेल येथील गोकुळ कॉम्प्लेक्स मध्ये गेल्या ८ वर्षापासून गणेशोत्सव साजरा होत आहे. दरवर्षीप्रमाणे गणपती डेकोरेशन आगमन दररोज आरती ३१ ऑगस्ट रोजी महाप्रसाद तसेच मुलांच्या संगीत खुर्ची महिलांचे गौरीचे आगमन व पूजा त्याचबरोबर कान उघडणे महिलांनी उस्फूर्तपणे कार्यक्रम केले. अनेक भक्तांनी महाप्रसादासाठी अन्नधान्य व मनोभावे सेवा केली. मंडळांने सर्व कार्यक्रमाचे नियोजन केले.
यावर्षी डॉल्बी सारख्या वाद्याला फाटा देत महिलांनी “श्री गणेशा ” या गाण्यावर लेझीमच्या तालात पारंपारिक वाद्यासोबत नृत्य केले. त्यामुळे मिरवणुकीला भक्तिमय व आनंददायी वातावरण निर्माण झाले. विशेष म्हणजे महिलांनी एकसारख्या साड्या परिधान केल्यामुळे कार्यक्रमाची शोभा वाढली. पुरुष लहान मुले यांनी पारंपारिक वेशभूषा परिधान केले होती.” गणपती बाप्पा मोरया ,मंगलमूर्ती मोरया” या जय घोषात गोकुळ कॉम्प्लेक्सचा परिसर दुमदुमला. अतिशय शिस्तबद्ध व नियोजनबद्ध मिरवणूक पार पडली.




