डॉ.भगवान बिरमोले आई समाज कल्याण संस्था आरोग्य दूत पुरस्काराने सन्मानित.
आई समाज कल्याण संस्थेच्या पुरस्काराची उंची वाढणारा क्षण..अब्दुलहाई शेख.

दैनिक झुंजार टाईम्स
साबीर शेख:- पनवेल प्रतिनिधी
दिनांक:-०६-०९-२०२५
पनवेल:- कोकणचे सुपुत्र पनवेल येथील सुप्रसिद्ध डॉ.भगवान बिरमोले वैद्यकीय क्षेत्रातील नामवंत व्यक्ती आहेत. ते सामाजिक बांधिलकीच्या संवेदनशील भावनेतून बिरमोले ट्रस्ट च्या माध्यमातून अनेक गरिब,गरजू रुग्णांवर सहकार्याच्या हेतूने वैद्यकीय सेवा देत असतात . दरवर्षी प्रमाणे उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करणाऱ्या आई समाज कल्याण संस्थेने अब्दुलहाई शेख यांच्या अध्यक्षते खाली महत्व पूर्ण पुरस्कार देण्याचा निर्णय घेण्यात आला . आज दि.०६ सप्टेंबर रोजी संस्थेच्या व्हाईस चेअरमन साईदा अब्दुलहाई, जनरल सेक्रेटरी सहेर अब्दुलरहमान आणि संस्थेचे खजिनदार अब्दुलरहमान शेख यांनी संस्थापक अध्यक्ष अब्दुल हाई यांच्या हस्ते डॉ. भगवान बिरमोले यांना संस्थेचे सन्मान चिन्ह , प्रशस्तीपत्र , श्वाल ,पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले.नामवंत अनुभवी वैद्यकीय तज्ञ म्हणून लोकप्रिय डॉ.बिरमोले गेल्या ३५ वर्ष रुग्ण सेवा हिच ईश्वर सेवा या माध्यमातून कार्य करत असल्याने त्यांच्या कार्याची विशेष दखल घेत त्यांना आरोग्यसेवादूत पुरस्कार मिळाल्याने पनवेलच्या शिरपेचात मानाचा तुरा मिळाल्याने रायगड जिल्ह्यातुंन त्यांच्या वर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.




