पुरोगामी पत्रकार संघ(भारत) पेण तालुका अध्यक्ष पत्रकार कैलासराजे घरत आयोजित घरगुती गणपती सजावट(आरास) स्पर्धा-२०२५ मोठ्या उत्साहात संपन्न..!

दैनिक झुंजार टाईम्स
कैलासराजे घरत:- पेन (खारपाडा) प्रतिनिधी
दिनांक:- ०६-०९-२०२५
पेन (खारपाडा):- पुरोगामी पत्रकार संघ (भारत) राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष विजयजी सूर्यवंशी साहेब यांच्या नेतृत्वाखाली व मार्गदर्शनाने पुरोगामी पत्रकार संघ पेण तालुका अध्यक्ष पत्रकार कैलासराजे घरत आयोजित घरगुती गणपती सजावट (आरास) स्पर्धा-२०२५ मोठ्या उत्साहात संपन्न झाली. ग्रूप ग्रामपंचायत दुष्मी-खारपाडा अंतर्गत दुष्मी, खारपाडा, ठाकूरपाडा, वडमाळवाडी खैरासवाडी या गावातून दुष्मी येथील समाधान जयराम देसले यांच्या घरचा “देसल्यांचा राजा” या गणपती बाप्पा सजावटीसाठी प्रथम क्रमांक मिळाला आहे. त्यांनी अहमदाबाद विमान दुर्घटनेचा चलचित्र देखावा दाखवून सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न केला असून गणरायाला साकडे घातले आहे की अशी घटना पुन्हा घडू नये. सुरक्षित जीवन सुरक्षित प्रवास या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ दिनांक ०६.०९.२९२५ रोजी दुपारी १२ वाजता समाधान जयराम देसले यांच्या घरी जाऊन दुष्मी पार पडला. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून पुरोगामी पत्रकार संघ(भारत) अंतर्गत अन्याय अत्याचार निवारण समितीच्या रायगड जिल्हा अध्यक्षा अश्विनी ठाकूर आणि इचलीगिरी संप्रदाय कोकण अध्यक्ष आमचे मार्गदर्शक गुरुवर्य कृष्णा वर्तक उपस्थिती राहून समाधान जयराम देसले(दुष्मी) यांच्या परिवाराला शुभेच्छा दिल्या, देसले कुटुंबात एकूण २७ माणसे असून सर्व परिवार एकोप्याने आणि गुण्यागोविंदाने अतिशय उत्साहात हा गणेशोत्सव साजरा करतात. त्यासाठी स्वतः समाधान देसले आणि त्यांचा परिवार त्यांना मदत करतो. लोकमान्य टिळकांनी ज्या उद्देशाने या उत्सवाची सुरुवात केली तो उद्देश समाजात एकजूट आणि एकोपा निर्माण व्हावा. तोच उद्देश डोळ्यासमोर ठेवून देसले कुटुंबीय वाटचाल करीत आहेत. असेच सुंदर चलचित्र देखावा दाखवून सामाजिक संदेश देत राहा ह्याच सदिच्छा. धन्यवाद





