वाहतूक

पनवेल येथे रिक्षा संघटनेच्या फलकाच उद्घाटन मोठ्या उत्साहात संपन्न.

दैनिक झुंजार टाईम्स 

पनवेल प्रतिनिधी: राजपाल शेगोकार

दिनांक:- १६-०८-२०२५

वंदे मातरम रिक्षा चालक-मालक संघटनेचा २०१९ पासून पनवेल नंदनवन कॉम्प्लेक्स येथे हायवे लगत रिक्षा नाका उपलब्ध होता. २०१९ पासून वंदे मातरम रिक्षा युनियन मार्फत आरटीओ मान्यता प्राप्ती साठी सतत पाठपुरावा करून तो आज १५ ऑगस्ट २०२५ रोजी वंदे मातरम रिक्षा चालक-मालक संघटनेचे व जनरल कामगार संघटनेचे उपाध्यक्ष रविनाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांच्या हस्ते  फलकाचे अनावरण करण्यात आले. यावेळी वंदे मातरम रिक्षा चालक मलाक संघटनेचे सर्व पदाधिकारी व सभासद उपस्थित होते. तसेच पनवेल वाहतूक शाखेचे उपनिरीक्षक संजय पंढारे, व पोलीस हवालदार ज्ञानेश्वर पवार, तसेच वंदे मातरम रिक्षा चालक मालक संघटनेचे नाका अध्यक्ष व पुरोगामी पत्रकार संघटनेचे रायगड जिल्हा सचिव व शिवधर्म वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक राजपाल शेगोकार, व नाका उपाध्यक्ष जितेंद्र म्हात्रे , नाकाप्रमुख अभिलाष डांगरकर, माझी नाका उपप्रमुख बाळासाहेब भालेकर, दीपक पाटोळे, नितीन गव्हाणकर, विजय सावर्डे, बाबू वाजे, राजेंद्र पोटे ,जालिंदर वाघ, दीपक सोनताटे, सुरज सादिगले, सुनील माळी , कृष्ण नवले, हरिभाऊ बोराडे, सतीश चेके, शरद आदईकर ,राजू इथापे, शिवदास पाखरे ,व इतर सर्व पदाधिकारी व सदस्य यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button