श्री ज्योतिर्लिंग विद्यालय जिंती येथे स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा.

दैनिक झुंजार टाईम्स
अमोल पाटील:- कराड(जिंती) प्रतिनिधी
दिनांक:- १६-०८-२०२५
जिंती तालुका कराड येथे श्री ज्योतिर्लिंग विद्यालय जिंती स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा झाला. ध्वजारोहण ज्ञान प्रबोधिनी फाउंडेशन जिंती चे पदाधिकारी व शालेय व्यवस्थापन समितीचे शिक्षण तज्ञ सदस्य माननीय अमर आत्माराम पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमा वेळी अमर पाटील म्हणाले श्री अमर पाटील यांनी भाषणात भारताला मिळालेल्या स्वातंत्र्याचा अभिमान सर्वांनी बाळगावा त्याचबरोबर आता आपला लढा आपले व्यक्तिमत्व घडवण्यासाठी असणार आहे हे लक्षात घ्यावे, नोकरी व्यवसायासाठी सध्या जीवघेणी स्पर्धा असून करिअरच्या अनेक संधी निर्माण होताना नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करून स्वतःला घडविले पाहिजे असा आत्मविश्वास ही विद्यार्थ्यांना दिला शैक्षणिक उपक्रमासाठी ज्ञान प्रबोधिनी फाउंडेशन आपणास सहकार्य करत राहील असा विचार मांडला.
विद्यालयात होणाऱ्या विविध उपक्रमाविषयी समाधान व्यक्त केले व विद्यालयाच्या गुणवत्ता वाढीसाठी शुभेच्छा दिल्या.
ज्ञान प्रबोधिनीचे पदाधिकारी मा संजय खराडे उपस्थित होते या कार्यक्रमास जिंती गावातील महसूल अधिकारी शीतल पाटील, पोलीस पाटील मा. संतोष पाटील, माजी मुख्याध्यापक ए आर पाटील, पत्रकार व ग्रामपंचायत सदस्य मा. राजेंद्र पाटील, विश्वासराव पाटील, संजय पाटील आप्पा, अशोक पाटील, महसूल विभागाचे कर्मचारी श्रीकांत साळुंखे इत्यादी ग्रामस्थ कार्यक्रमास उपस्थित होते विद्यालयाचे मुख्याध्यापक अशोक कोठावळे यांनी उपस्थित सर्व ग्रामस्थांना, विद्यार्थ्यांना व पालकांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या. विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक संभाजी खोचरे सर यांनी सर्वांचे स्वागत केले व विद्यालयात चालणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली, कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विद्यालयातील शिक्षिका वनिता कुंभार, रूपाली माळी, दिनकर आंबवडे, लिपिक गणेश साळुंखे सर, संदीप मोहिते दादा यांनी सहकार्य केले.
उपस्थितांचे आभार विज्ञान शिक्षक गणेश तपासे यांनी मांडले.