आरोग्य विषयक
पनवेल महानगरपालिका व टाटा हॉस्पिटलमध्ये कर्करोग तपासणीसाठी करार.

दैनिक झुंजार टाईम्स
महेंद्र माघाडे:- उलवे-नवीमुंबई प्रतिनिधी
दिनांक:- १५-०८-२०२५
पनवेल, दि. १४ : पनवेल महानगरपालिका आणि एसीटीआरईसी खारघर टाटा हॉस्पिटल यांच्यात कर्करोग तपासणी व प्रशिक्षणासाठी करारनामा करण्यात आला. हा उपक्रम ‘अंगदान जीवन संजीवनी अभियान’ अंतर्गत राबविण्यात येणार असून पनवेलमधील सर्व २६ नागरिक प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये तपासणी केली जाणार आहे.
कार्यक्रमात आमदार प्रशांत ठाकूर, आयुक्त मंगेश चितळे, उपायुक्त प्रसेनजित कारलेकर, वैद्यकीय अधिकारी तसेच टाटा हॉस्पिटलचे तज्ञ उपस्थित होते. तीन अत्याधुनिक रुग्णवाहिकांचे लोकार्पणही करण्यात आले. अवयवदानाचे महत्त्व अधोरेखित करत आमदार ठाकूर यांनी स्वतः व पत्नीने अवयवदानाचा अर्ज भरल्याचे सांगितले.