कर्तव्यनिष्ठ पत्रकार शंकरसिंह ठाकूर यांना ‘तुफानातले दिवे’ पुरस्कार जाहीर.

दैनिक झुंजार टाईम्स
महेंद्र माघाडे. उलवे-नवीमुंबई.प्रतिनिधी.
नांदेड –. मंगळवार दिनांक १३ ऑगस्ट.
पत्रकारिता क्षेत्रातील निर्भीड, धडाकेबाज, निडर आणि परखड कार्यासाठी ओळखले जाणारे, दैनिक वीर शिरोमणी चे मुख्य संपादक तसेच राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे राज्य कार्याध्यक्ष आदरणीय शंकरसिंह ठाकूर यांना यंदाचा ‘तुफानातले दिवे’ हा पुरस्कार जाहीर झाला आहे.
हा सन्मान युगकवी वामनदादा कर्डक आणि प्रतापसिंग बोदडे संयुक्त जयंती सोहळ्याच्या निमित्ताने प्रदान करण्यात येणार आहे. साहित्य, पत्रकारिता, सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, वैद्यकीय, सांस्कृतिक आणि धर्मप्रचार या विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याचा गौरव म्हणून हा पुरस्कार दिला जातो.
पुरस्कार वितरण समारंभ रविवार, दि. ३१ ऑगस्ट २०२५ रोजी दुपारी २ वाजता, डॉ. शंकरराव चव्हाण पैठणगृह, स्टेडियम जवळ, नांदेड येथे पार पडणार आहे.
राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ. रायगड. परिवाराकडुन, शंकरसिंह ठाकूर साहेबांचे, हार्दिक अभिनंदन करून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.