कायद्याला न जुमानता धाब्यावर ,चायनीज वर दारू विक्री ; FLII आणि FLII – CL3 परवाने धारक त्रस्त.
पनवेल- कोन-कोळखे बनलय व्यसनाधीन व बेकायदेशीर बाबींचा अड्डा ...नितीन पगारे

दैनिक झुंजार टाईम्स
साबीर शेख:- पनवेल प्रतिनिधी
दिनांक:- १२-०८-२०२५
पनवेल:- ऐतिहासिक पनवेल तालुका सध्या कुप्रसिद्धी मिळवत ओळख निर्माण करत आहे .तसे सध्या पनवेल विविध विकास कामाच्या दृष्टीने मार्गस्थ असून पनवेलकरांच्या जीवनात मात्र असहनिय ताण , तणाव , अपुऱ्या सुविधा, जीव घेणं प्रदूषण,असह्य वाहतूक कोंडी , गुन्हे गारी व अन्य चिंता सतावत आहे. अश्या धगधगीच्या जीवनात पनवेलकरांना आपल्या परिवारा सोबत रोज बेकायदेशीर , अवैध बाबी पासून त्रस्त होऊन असुरक्षित जगावे लागत आहे. नियम बाह्य पद्धतीने लेडीज बार व लॉज ,धाबे,चायनिस कॉर्नर उपलब्ध करून देणारे परप्रांतीय व्यावसायिक या सर्व विषयांसाठी जवाबदार आहेत. त्यात कोन, कोळखे, पळस्पे महसुली गावातील ग्रामस्थ व प्रवासी सध्या अनेक संकटातुंन जगत आहे. पनवेल- कोकण -कर्जत- उरण- खोपोली-मुंबई शी जोडलेल्या रस्त्यावरील प्रवाश्यांच्यासाठी प्रचंड वाहतूक कोंडी व मद्यप्रेमी दारुबाजांचे अड्डे म्हणून हे ठिकाण कुप्रसिद्ध होत आहे.त्याला कारण उघड्या डोळ्यांनी पाहत असलेले सोयीची संधी साधणारे प्रशासन आणि स्थानिक आजी, माजी लोकप्रतिनिधी व नागरीक .या ठिकाणी म्हणे बाई, बाटली, अमली पदार्थ, गुन्हेगारी,वाहतूक कोंडी, गुंडगिरी रात्री बेरात्री बिनदास्त असते असे सरास पणे नागरीक व प्रवासी चर्चा करताना दिसतात .दुर्दैव म्हणजे असे काही ऐकायला मिळते की काहीही करा फक्त आम्हाला महिना द्या म्हणून पाठीशी घालणारे सरकारी बहुसंख्य वर्दीतील जनतेचे सेवक यांचे पाठी राखे रक्षक बनले आहे .मुंबई पुणे दूतर्गती मार्ग सोडून पनवेल कडे मार्गस्थ झाल्यास स्वागत करणारे व्यसनते कडे प्रवृत्त करणारे अनेक आर्केस्ट्रा, लेडीज बार दोन्ही बाजूने शाळेच्या मधोमध सजलेले पहायला रात्रभर बेकायदेशीर पणे पहायला मिळतात .नंतर तो प्रवास पळस्पे उड्डाणपूल पर्यंत वाहतूक कोंडीवर देऊन मनस्ताप होई पर्यंत दररोजच असतो. त्यातच रस्त्या लगतच परप्रांतीय लोकांचा अडथळे निर्माण करून विनापरवाना थाटलेला अतिक्रमण व धाब्यावर , चायनीज वर बेकायदेशीर पणे मिळणारे दारू गुत्ते सरास पणे उघड्यावर चालू आहे. आम्ही हप्ते देतो म्हणून त्यांची गुंडा गर्दी करणारे अनेक अनुभव सार्वजनिक बांधकाम विभाग ,राज्य उत्पादन शुल्क , पोलिसांच्या भूमिकेवर शंका निर्माण करणारे व कायद्याची पायमल्ली करणारे आहे. मात्र हे सर्व सामन्य जनतेने उघडया डोळ्यांनी पाहायच असे एवढंच दुःख उरलेल आहे. जवाबदारी नेमकी कोणाची म्हणून हताश मनानं जीवन जगायचं अशी काही मानसिकता स्थानिक जनतेची झाली आहे.या सर्व प्रकारच्या माहिती पोलीस, तहसिल व अन्य महसूल,अन्न,प्रशासन, सार्वजनिक बांधकाम प्रशासनाकडे उपलब्ध असून सुद्धा यावर मात्र कायमस्वरूपी तोडगा काढण्यात सरकारी अधिकारी अपयशी असल्याचे दिसत आहे. राज्य उत्पादन शुल्क पनवेल विभाग यावर मात्र ” पांचो उंगली घी मे.. ओर सर कढाई मे…” या स्वार्थी सुखात जगत कसलीही कठोर कारवाई न करत असल्याचे चित्र समोर येत आहे .दुसरीकडे स्थानिक स्वराज्य संस्था ग्रामपंचायत , ग्रामस्थ,अजी माजी लोकप्रतिनिधी ,संघटना मात्र सामाजिक जवाबदारी सुज्ञ ,जागरूक घटक म्हणून अंकुश ठेवण्यात रुची ठेवत नसल्याने करदाते चिंता व्यक्त करताना दिसतात .यावर मराठी माणसाच्या पनवेलला अमराठी कुसंस्कृती षड्यंत्र पासून वाचण्यासाठी समाजातील घटकांना पुढे यावे लागेल हि काळाची गरज आहे असे सामजिक कार्यकर्ते नितीन पगारे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. काही वर्षासाठी पदावर आलेले जनतेचे सेवक प्रचंड भ्रष्टाचार करून काळी कमाई करून संपत्ती जमवून उपभोग घेऊन जातात. पण दुसरीकडे अमराठी वर्ग जन्मभूमीत गोपनीयतेने विष पेरत आहे . त्यावर अंकुश ठेवण्यासाठी पनवेलकर जागृत व्हावे अश्या मानसिकतेची सध्या मोठी गरज आहे . “हम करे सो कायदा म्हणणारे अमराठी पनवेल भूमीला गोचीडासारखी चिपकलेले काही परप्रांतीयच आहेत . आपल गाव, शहर, दळणवळण, व्यापार,धोरण , संस्कृती, परंपरा ,भावी पिढी सगळी मराठी माणसाच्या हातात न ठेवल्यास परप्रांतीय विकृती दलदलीत ऱ्हास होईल हे मात्र नक्की.