जेष्ठ समाजसेवक रत्नाकर काशीराम घरत यांच्या तर्फे वडमाळवाडी येथे आदिवासी विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप!
जेष्ठ समाजसेवक रत्नाकर काशीराम घरत यांच्या तर्फे वडमाळवाडी येथे आदिवासी विद्यार्थ्यांना वह्या वाटप, झेंडे बॅच, खाऊ वाटप कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला..! "समाजसेवक रत्नाकर काशीराम घरत यांचा स्तुत्य उपक्रम."

दैनिक झुंजार टाईम्स
कैलासराजे घरत:- पेण प्रतिनिधी
दिनांक:- १२-०८-२०२५
जेष्ठ समाजसेवक रत्नाकर काशीराम घरत यांच्या सौजन्याने रा.जि.प. प्राथमिक शाळा वडमाळवाडी येथे आदिवासी विद्यार्थ्यांना वह्या वाटप, झेंडे बॅच, खाऊ वाटप कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. वडमाळवाडी शाळेचे मुख्याध्यापक मंगेश कांबळे सर यांनी शब्द सुमनांनी स्वागत करून प्रास्ताविक भाषण केले. उपस्थित मान्यवरांचे वडमाळवाडी शाळेच्या शिक्षकांनी शाल पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
सामाजिक बांधिलकी जपत आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शैक्षणिक साहित्य वह्या वाटप करण्याचे पवित्र कार्य केले आहे. त्याबद्दल जेष्ठ समाजसेवक रत्नाकर काशीराम घरत यांचे मनापासून आभार.
या कार्यक्रमाचे आयोजन सामाजिक कार्यकर्ते महाराष्ट्र भूषण आचार्य अत्रे उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार सन्मानित पुरोगामी पत्रकार संघाचे पेण तालुका अध्यक्ष पत्रकार कैलासराजे निर्मला कमलाकर घरत यांनी केले होते.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सामाजिक कार्यकर्ते अविनाश धनाजी मोकल, आमचे मार्गदर्शक हनुमान बाबू घरत उपस्थित होते. रा.जि.प. प्राथमिक शाळा वडमाळवाडी शाळेचे मुख्याध्यापक मंगेश कांबळे, जानकी येवले, अंकुर ट्रस्टचे फील्ड ऑफिसर राजेश रसाळ आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद दिसत होता. तो अमूल्य होता. या अतिशय स्तुत्य अशा उपक्रमाचे वडमाळवाडी शिक्षक वृंद आणि ग्रामस्थ यांचेकडून कौतुक करण्यात येत आहे.