शैक्षणिक

गौळवाडी येथे निबंध व चित्रकला स्पर्धा उत्साहात संपन्न!

विद्यार्थ्यांनी मौलिकता जपावी – विजय सूर्यवंशी

दैनिक झुंजार टाईम्स 

भालचंद्र गायकवाड:- कर्जत प्रतिनिधी 

दिनांक:- १२-०८-२०२५

कर्जत प्रतिनिधी (रायगड), सोमवार ११ऑगस्ट – राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ (संचालित) अन्याय अत्याचार निवारण समिती, कर्जत तालुका यांच्या वतीने गौळवाडी माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय येथे निबंध व चित्रकला स्पर्धा उत्साहात पार पडली.

कार्यक्रमाचे उद्घाटन संघाचे संस्थापक अध्यक्ष विजय सूर्यवंशी यांच्या हस्ते झाले. प्रारंभी महापुरुषांना अभिवादन करण्यात आले व मान्यवरांचा शाल व गुलाबाच्या फुलांनी सत्कार झाला. प्रस्ताविक भाषण तालुकाध्यक्ष जयवंत धर्मा मसणे यांनी केले, तर शाळेचे मुख्याध्यापक गलगले सर यांनी शाळेचा इतिहास व कार्याचा आढावा सादर केला.

संघाचे संस्थापक अध्यक्ष विजय सूर्यवंशी म्हणाले, “विद्यार्थी हे उद्याचे भावी नागरिक आहेत. निबंध व चित्रकलांमध्ये कल्पकता व मौलिकता जपावी. मोबाईलचा वापर कमी करून वाचन, चिंतन व संवाद वाढवावा.” त्यांनी पुढे सांगितले की, प्रत्येक शैक्षणिक कार्यक्रमाची सुरुवात ‘शिक्षणाची जननी’ माता सावित्रीबाई फुले यांच्या पूजनाने व्हावी,

तसेच आठवड्यातून एक दिवस* मुला-मुलींच्या मैत्रीपूर्ण संवादाद्वारे त्यांच्या समस्या आणि अन्यायाविषयी माहिती घेण्यात यावी.

आभार प्रदर्शन रायगड जिल्हा कार्याध्यक्ष सचिन गायकवाड यांनी केले. या कार्यक्रमाला ठाणे, मुंबई व रायगड जिल्ह्यातील संघ व समितीचे अनेक पदाधिकारी आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संघाच्या संस्थापक अध्यक्ष  सूर्यवंशी, सचिन गायकवाड रायगड जिल्हा कार्याध्यक्ष, भालचंद्र गायकवाड, कर्जत तालुका अध्यक्ष,  संजय वरघडे, कर्जत तालुका सचिव, सुनील जाधव:कर्जत तालुका संपर्क प्रमुख, दिनेश आढाव कर्जत तालुका कार्याध्यक्ष, बाळाराम सावंत, खालापूर तालुका अध्यक्ष, दिनेश राठोड:नेरळ शहर कार्याध्यक्ष,  हिरादास सोनावळे, ठाणे जिल्हा उपाध्यक्ष, नरेंद्र बबन पाटील:कल्याण शहर अध्यक्ष, विशाल पाटील:भिवंडी शहर अध्यक्ष, बाबू घारे, उपसंघटक कर्जत तालुका शिवसेना प्रमुख, नारायण सोनावळे, शिक्षण विस्तारधिकारी केंद्रप्रमुख वैजनाथ, जयवंत धर्मा मसणे, कर्जत तालुका अन्याय अत्याचार निवारण समिती अध्यक्ष, जगदीश रामचंद्र कांबेरे, कर्जत तालुका अन्याय अत्याचार निवारण समिती उपाध्यक्ष, जुनेद जमाल मालदार, कर्जत तालुका अन्याय अत्याचार समिती सचिव, अनिल अर्जुन गळगळे मुख्याध्यापक, आनंद जाधव ज्येष्ठशिक्षक बहिरू सारुक्ते शिक्षक प्रतिनिधी, रामदास ठमके सदस्य, प्रकाश ढाकवल सदस्य मनोहर श्रीखंडे सदस्य, विलास मसणे सदस्य, प्रमोद माळी, कर्जत तालुका राष्ट्रवादी ज्येष्ठ कार्यकर्ते नाथा बागडे  सामाजिक कार्यकर्ते

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button