द्वितीय पुण्यतिथी निमित्त गोरगरीबांना धान्य वाटप!

दैनिक झुंजार टाईम्स
नाना खैरे:- मुंबई प्रतिनिधी
दिनांक:- ०८-०८-२०२५
सावली सहयोग संस्थेचे सन्मा.संचालक कालकथित महेंद्र नलावडे यांच्या दुसऱ्या पुण्यतिथी निमित्त विभागातील एकूण साठ दिव्यांग बांधवांना रेशनिंग किटचे वाटप संस्थेच्या माध्यमातून करण्यात आले. तसेच विभागातील दिव्यांग बांधवांना /जेष्ठ नागरिकांना आपल्या विभागाचे लाडके मा.नगरसेवक मा. समाधान सरवणकर यांनी छत्री देऊन एक हात मदतीचा केला त्याबद्दल संस्थेच्या माध्यमातून संस्थेचे अध्यक्ष राजेश घोलप यांनी आभार मानले.तसेच संस्थेचे सचिव अनिल घोडके व संस्थेच्या खजिनदार पुजा सावंत यांनी कालकथित महेंद्र नलावडे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून पुजा कासारे यांनी दिप लावून कार्यक्रम सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती लाभली कूतिका जाधव व पुजा कासारे, (घरेलू कामगार संघटना संघटक )कार्यक्रम अत्यंत नियोजन पद्धतीने करण्यात आला असे संस्थेचे अध्यक्ष राजेश घोलप यांनी बोलताना सांगितले.