वाढदिवसाच्या शुभेच्छा
ऑल इंडिया पँथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दिपकभाई केदार यांचा वाढदिवसानिमित्त जीवनावश्यक वस्तुंचे वाटप!
ऑल इंडिया पँथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दिपकभाई केदार यांचा वाढदिवसानिमित्त...आदिवासी वाडीत जीवनावश्यक वस्तुंचे वाटप करुन साजरा करण्यात आला...

दैनिक झुंजार टाईम्स
भालचंद्र गायकवाड:- कर्जत प्रतिनिधी
दिनांक:- ०७-०८-२०२५
ऑल इंडिया पँथर सेना, रायगड जि.अध्यक्ष नरेशदादा गायकवाड यांच्या माध्यमातून संपूर्ण जिल्हा कमीटीच्या वतीने सुधागड तालुक्यातील वाघोशी गावाजवळील तीन अदिवासी वाडीत जीवनावश्यक वस्तुंचे ( कांदे,बटाटे,पीठ ) वाटप करण्यात आले. कार्यक्रमा प्रसंगी रायगड जि.अध्यक्ष नरेशदादा गायकवाड यांनी आपले विचार मांडतांना दिपकभाई केदार यांच्या कार्याची पध्दत कशी आहे. याची विस्तृत माहीती सांगुन दिपकभाई केदार यांना वाढदिवसाच्या मंगलमय शुभेच्छा व पुढील वाटचालीस हार्दिक मनोकामना व्यक्त करण्यात आल्य. कार्यक्रमास रायगड जि.अध्यक्ष नरेशदादा गायकवाड, रायगड जि.युवाध्यक्ष रामभाऊ गायकवाड, रायगड जि.संपर्क प्रमुख मंगेशजी सावंत, कर्जत ता.कार्याध्यक्ष भालचंद्र गायकवाड तसेच सुधागड तालुक्यातील सर्व कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.