माथाडी चळवळीच्या झुंजार नेत्याचा वाढदिवस.

दैनिक झुंजार टाईम्स
अमोल पाटील:- कराड प्रतिनिधी
दिनांक ०४-०८-२०२५
सहकार चळवळ आणि कामगार यांचा प्रति संगम म्हणजेच माननीय दिनकरराव भाऊसो पाटील उर्फ पोपटराव पाटील (बापू) ! दरवर्षी ४ ऑगस्ट रोजी दिनकरराव पाटील (बापू) वाढदिवस असतो. जिंती तालुका कराड येथील जन्मभूमी असणारे गाव. वडील शेतकरी असल्यामुळे पाटील यांनी आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह शेतीमधून फारसा होत नसल्यामुळे मुंबईची वाट धरली, मुंबईमधील छत्रपती शिवाजी मार्केट या ठिकाणी अगदी कमी वयात मच्छीचा व्यवसाय सुरू केला व आर्थिक परिस्थिती हळूहळू बदलत गेली. सामाजिक व धार्मिक कार्याची पाटील यांना पहिल्यापासून आवड होती. त्यामुळे त्यांनी दर्यासागर पतसंस्था यांची पहिली शाखा मस्ज्जिद बंदर या ठिकाणी स्थापन केली.
मुंबई ,घणसोली ,वाशी ,कामोठे, कराड, जिंती या विविध ठिकाणी पतसंस्था स्थापन करून सहकाराला एक वेगळी चालना निर्माण केली.
छत्रपती शिवाजी महाराज मच्छी मार्केट या ठिकाणी मार्केटमधील सामान्य जनतेचे या शाखेमध्ये आर्थिक व्यवहार चालू केले त्यामुळे पतसंस्थेत बचत व काटकर लागली. कराड व पाटण तालुक्यातील मुंबईमध्ये आलेल्या सामान्य जनतेचे चौफेर प्रश्न सोडवल्यामुळे बापूंचे नावलौकिक मुंबईमध्ये वाढू लागले. याच कालावधीत महाराष्ट्र राज्य मत्स्य विकास महामंडळाचे अध्यक्ष होते.
सहकारामध्ये काम करता करता माथाडींचे प्रश्न पुढे आल्यावर त्यांनी अखिल महाराष्ट्र माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियन संघटना स्थापना व अध्यक्ष होते आणि कामगारांच्या आर्थिक गरजा भागवण्यासाठी जनसागर कामगार सहकार पतपेढीची निर्मिती केली. याच काळात जनसागर सहकार पतपेढी यांना मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून सहकार गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. मुंबईमध्ये या सर्व गोष्टी करत असताना अनेक प्रसंग आले पण त्यांनी संकटापुढे हात न टाकता संकटाशी सामना केला. संघटनेमध्ये व पतसंस्थेत कराड व पाटण तालुक्यातील युवा पिढीला उद्योग व्यवसायामध्ये उत्तराविण्याचे काम केले. जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर मुंबईसारख्या ठिकाणी त्यांनी आपले पाय खचून रोहून यशाकडे वाटचाल करीत राहिले. याच कालावधीत त्यांना सातारा सहकारी बँकेमध्ये चेअरमन पदावर काम करण्याची संधी मिळाली. या संधीचे सोने करीत अनेक व्यक्तींची कामे केली.
मुंबई ही कर्मभूमी असतानाही त्यांची ओढ ही नेहमी जन्मभूमीकडे असायची. धार्मिक कार्यात नेहमी अग्रेसर असल्यामुळे जिंती गावातील ज्योतिर्लिंगाचे मंदिर सण २००८ मध्ये त्यांच्याच पुढाकाराने बांधले गेले. गिरजवडे येथील ज्योतिर्लिंग मंदिर सण १९९७ मध्ये बांधण्यासाठी सहकार्य केले. जिंती मध्ये हनुमान मंदिर सण १९८० मध्ये जीर्णोद्धार करण्यामध्ये त्यांचा मोठा सहभाग आहे. पंढरपूर येथील जिंतीच्या विठ्ठल भक्तांची निवासाची सोय करण्यासाठी त्यांचा मोठा पुढाकार आहे. जिंतीच्या कुस्ती मैदानात व भागातील कुस्ती मैदानात आवर्जून सहभाग होता.
तसेच पाटण तालुक्यातील मानाई मंदिर बांधण्यासाठी मोठे योगदान आहे. कराड व पाटण तालुक्यातील धार्मिक मंदिरे बनण्यासाठी दिलदार मनाने अनेक ठिकाणी देणग्या दिल्या आहेत त्यामुळे मंदिराच्या पाठीवरती आजही नाव दिसत आहे.
परमपूज्य स्वामी गगनगिरी महाराज यांच्या कृपाप्रसादावर त्यांचा मोठा विश्वास आहे. अनेक वर्षे त्यांनी बाबांची सेवा केली आहे व गगनगिरी महाराजांना जिंती ह्या ठिकाणी धार्मिक कार्यक्रमासाठी आणले होते. गगनगिरी महाराज आणि कुलदैवत ज्योतिर्लिंग या दोन देवतावर भावभक्तीची श्रद्धा आहे.
पाटील यांनी धैर्य ,चिकटीच्या जोरावर गृहनिर्माण संस्थेची निर्मिती २००६ साली स्थापन केलेल्या अखिल महाराष्ट्र माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल युनियन यांच्या जोरावर कामगारांचे हक्काची भाकरी मिळवून दिली. हे करत असताना त्यांना मानसिक त्रास सहन करावा लागला. त्यामध्ये राजकीय लोकांचे सुद्धा वैर पत्करावे लागले पण ते कुठेही मागे न हटता त्यांनी शक्तिशाली अखिल माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियन प्रतिभाशाली करण्याचे स्वप्न साकार करून दाखवले. याच काळात मुंबई काँग्रेस कमिटी मध्ये सदस्य असल्यामुळे अनेक अडथळे दूर झाले. माथाडी कामगारांना भरमसाठ भाडेवाढ न परवडणारे होते. ती खंत ओळखून त्यांनी घनसोली या ठिकाणी महाराष्ट्र शासनाच्या मंजुरीने टोलेगंज इमारत उभी करून माथाडी कामगारांचे मुंबईमधील हक्काचे घर स्वप्न पूर्ण केले . या कामासाठी पाटील यांनी अहोरात्र मेहनत केली.
जिंती गावातील शैक्षणिक क्षेत्रातही त्यांचा आजही मोलाचा वाटा आहे. जिल्हा परिषद शाळा जिंती या ठिकाणी प्रोजेक्टर वह्या शालेय उपयोगी वस्तू यासारख्या देऊन गोरगरीब मुलांना शिकण्यासाठी पाठिंबा दिला. गेल्या दहा वर्षांपूर्वी बापू यांच्या वाढदिवसानिमित्त कमाने पासून ते सोसायटीपर्यंत दुतर्फा झाडे लावण्यात आली आजही ती झाडे जिंती गावाकडे गेल्यावर आठवण करून देतात. जिंती गाव म्हटलं की पहिला प्रश्न येतो की पोपट शेठ चे गाव काय? असा प्रश्न विचारल्यावर जिंतीकरांची छाती नक्कीच मोठे होते. चार ऑगस्ट रोजी दिनकरराव भाऊसो पाटील (बापु) यांना समस्त शुभेच्छुक हितचिंतक मित्रपरिवार माथाडी कामगार वर्ग या सर्वांकडून लाख लाख शुभेच्छा.