सिंदेवाही पोलिस स्टेशन व मुस्लिम कब्रस्तान येथे वृक्षारोपण.
पुरोगामी पत्रकार संघाचा पुढाकार....

दैनिक झुंजार टाईम्स
चंद्रपूर (प्रतिनिधी)
दिनांक:-२९-०७-२०२५
राज्यातील वनाच्छदनाची टक्केवारी वाढविण्यासाठी हरित महाराष्ट्र, समृद्ध महाराष्ट्र हे अभियान लोकचळवळ झाली तरच ही मोहीम यशस्वी होईल असे प्रतिपादन मुख्यमंत्री यांनी केले होते तसेच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील एक पेड माँ के नाम या अभियानाचे औचित्य साधून पुरोगामी पत्रकार संघ शाखा सिंदेवाहीच्या वतीने चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही पोलिस स्टेशन परिसरात व मुस्लिम कब्रस्तान येथे वृक्षारोपण आज सकाळी करण्यात आले.
याप्रसंगी सिंदेवाही-लोनवाही चे नगराध्यक्ष भास्कर नन्नावरे सिंदेवाही पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कांचन पांडे, मुस्लिम कब्रस्तान कमेटीचे अध्यक्ष युनुसभाई शेख,सिंदेवाही जामा मस्जिद चे अध्यक्ष चांद शेख, माजी नगराध्यक्ष मयुर सुचक, नगरपंचायत सभापती दिलीप रामटेके, पोलिस नारायण येगेवार,सामाजीक कार्यकर्ते नोमान पटेल व राहुल सिंग ठाकुर उपस्थित होते.
वृक्षारोपन नियोजन पुरोगामी पत्रकार संघ शाखा सिंदेवाही अध्यक्ष-मिथुन मेश्राम, उपाध्यक्ष-कुनाल उंदीरवाडे, सचिव-अमान कुरैशी, रोशन खानकुरे,विशाल लोखंडे,अमोल निनावे, देवानंद लोखंडे यांचे योगदान लाभले