सामाजिक

महाराष्ट्र भुषण डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान. यांच्या माध्यमातून कर्जत पोलीस स्टेशन यांना १०० बॅरिकेटस चे वाटप.

दैनिक झुंजार टाईम्स 

संजय वरघडे:- कर्जत प्रतिनिधी 

दिनांक:- २४-०७-२०२५

बुधवार दिनांक २३ जुलै २०२५ रोजी  महाराष्ट्र भुषण डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून कर्जत पोलीस स्टेशन यांना १०० बॅरिकेटस चे वाटपाचा कार्यक्रम श्री विठ्ठल मंदिर दहिवली येथे संपन्न झाला. या सोहळ्यासाठी संदिप भोसले पोलीस निरीक्षक कर्जत, तानाजी चव्हाण मुख्याधिकारी कर्जत, राहूल वरोटे सहाय्यक पोलीस निरीक्षक, मनिषा लटपटे सहाय्यक पोलीस निरीक्षक आदी उपस्थित होते.

प्रमुख पाहुण्यांनी श्री विठ्ठल मंदिरात दर्शन घेतले तेव्हा देवस्थांनाकडून त्यांचा सत्कार करण्यात आला.

श्री गणेश पुजन व दिप प्रज्वलन करुन कार्यक्रमाची सुरुवात झाली. प्रतिष्ठानच्या वतीने पाहुण्यांचा सत्कार भगवान भोसले, श्रीधर बुंधाटे, अशोक भागीत व शंकर देशमुख याचे हस्ते करण्यात आला.

प्रस्तावना मध्ये विकास चित्ते यांनी डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा यांचे माध्यमातून होणारी कामे होणारी सामाजिक व पर्यावरण पुरक कामांची माहिती दिली. प्रतिष्ठानच्या माध्यमातून स्वच्छता अभियान, रक्तदान शिबिर, प्लाईमादान शिबीर, वैद्यकीय तपासणी शिबिर, वृक्षारोपण, वृक्षसंवर्धन, गांडूळ खत प्रकल्प, सेंद्रिय खत प्रकल्प, पावसाचे पाणी अडविण्याचे प्रकल्प , सांडपाणी व्यवस्थापन, शारीरिक अपंगत्व आलेल्यांना वैद्यकीय साधने देणे, विहीरीतील / तलावातील गाळ काढणे इत्यादी सामाजिक कामांचा उल्लेख केला. तसेच प्रतिष्ठानच्या माध्यमातून घेतलेल्या डी. वाय. पाटील स्टेडियमवर घेतलेल्या आरोग्य शिबीराची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये झाल्याची माहिती दिली.

डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी यांना मरणोत्तर महाराष्ट्र भुषण, डॉ. श्री. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना केंद्राचा मानाचा पद्मश्री पुरस्कार व डॉ. श्री. सचिन दादा धर्माधिकारी यांना विशेष रायगड भूषण पुरस्कार मिळाल्याची माहिती सन्माननिय पाहुण्यांना दिली.

कर्जत पोलीस स्टेशन च्या विनंती नुसार प्रतिष्ठान कडून १०० बॅरिकेट देण्यात येत असल्याचे सांगितले.

सत्काराला उत्तर देताना मुख्याधिकारी तानाजी चव्हाण यांनी प्रतिष्ठान चे आभार मानून या बॅरिकेट मुळे कर्जत ची वाहतूक व्यवस्था सक्षम होईल असे प्रतिपादन केले.

संदिप भोसले, पोलीस निरीक्षक, कर्जत यांनी मनोगत व्यक्त करताना प्रतिष्ठानने खुप मोलाची मदत केल्याचे नमुद केले. कर्जत तालुक्यात अनेक पर्यटक येत असतात, अनेक फार्म हाऊस वर मोठ्या प्रमाणात लोक येत असतात, विशेषतः शनिवार, रविवारी होणारी वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी या बॅरिकेट मुळे खुप मदत होईल व वाहतूक व्यवस्था सुरळीत होण्यासाठी प्रतिष्ठान कडून खुप महत्वाची मदत मिळाल्याने आभार मानले.

डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी, डॉ. सचिन दादा धर्माधिकारी यांचे मार्गदर्शनाखाली चालू असलेल्या सामाजिक कामाचे व प्रकल्पाचे स्वागत करुन भविष्यातही असेल सहकार्य मिळावे अशी विनंती केली. प्रतिष्ठान च्या या सहकार्याबद्दल पोलिस स्टेशन कडून देण्यात येणारे आभारपत्राचे वाचन करुन आभारपत्र प्रतिमा दिली. आभारपत्र प्रतिमा प्रतिष्ठान च्या वतीने विनोद येवले , भगवान भोसले, श्रीधर बुंधाटे , अशोक भागीत यांनी स्विकारले.

पोलीस निरीक्षक संदिप भोसले यांनी हा कार्यक्रम श्री विठ्ठल मंदिरात आयोजित केल्याबद्दल आनंद व्यक्त केला .

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विकास चित्ते व आभार प्रदर्शन खडे गुरुजी यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button