सिंहस्थासाठी नदी संवर्धनाला अधिक प्राधान्य.
जिल्हाधिकारी : 'चला जाणूया नदीला' विषयावर चर्चासत्रनाशिक.

दैनिक झुंजार टाईम्स
प्रकाश आबड:- नाशिक प्रतिनिधी
दिनांक:- २०-०७-२०२५
‘चला जाणू या नदीला’ याउपक्रमात समाविष्ट नद्यांसह सर्वचनद्यांच्या संवर्धनासाठी लोकसहभागअत्यंत महत्त्वाचा आहे, सिंहस्थाआधी गोदावरी नदी व उपनद्यच्या स्वच्छतेला अधिक प्राधान्य देण्यात येईल, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी येथे केले.जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहात गुरुवारी (दि. १७)’चला जाणू या नदीला’ याउपक्रमाबाबत चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते.
त्या वेळी ते बोलत होते. या वेळी सहायक जिल्हाधिकारी ओमकार पवार, नाशिक पश्चिम भागाचे उपवनसंरक्षक तथा ‘चला जाणू या नदीला’ समितीचे सदस्य सचिव सिद्धेश सावर्डेकर, त्र्यंबकेश्वर नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी डॉ. श्रीया देवचक्के, मनपा नाशिक उपायुक्त श्री नितीन नेर , महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ चे श्री गायकवाड, नदी प्रहरी अशासकीय सदस्य राजेश
पंडित, गोदावरी नदी पहरी सौ. अपर्णा कोठावदे, वरुणा नदी प्रहरी श्री सुनिल परदेशी, सौ. श्रध्दाताई दुसाने, नंदिनी नदी प्रा. सोमनाथ मुढाळ सर , चंदु पाटिल, वालदेवी नदी प्रहरी श्री उदय थोरात, मोती नंदी प्रहरी व कुसमोडी पर्टनचे श्री मनोज साठे, कपिला नदी प्रहरी श्री योगेश बर्वे, आहिल्यानदी प्रहरी अंबरीश मोरे म्हाळुंगी नदी प्रहरी डॉ रुपवते आदी उपस्थित होते.उपवनसंरक्षक सावर्डेकर यांनी सांगितले की, जिल्ह्यातील मोती, म्हाळुंगी, वाल,नंदिनी, अगस्ती, कपिला, वरुणा या नदीकाठावर नदी संवादयात्रा उपक्रम राबविण्यात येणार आहे. त्याचे नियोजन सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. या चर्चासत्रात नंतर श्री विजयश्री सेवा संस्थेचे वतीने हरितकुंभ २०२७ साठी कुसमोडी पर्टन सारखा वुक्षरोपन कार्यक्रम मा जिल्हाधिकारी श्री जल शर्मा साहेब यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले सर्व शासकीय अधिकारी कर्मचारी व गोदावरी नदी व उपनद्या नदी प्रहरी उपस्थित होते