शैक्षणिक
शालेय फी वाढीविरोधात कायदेशीर कारवाई करू
दैनिक झुंजार टाईम्स
राजपाल शेगोकार:- मुंबई प्रतिनिधी
दिनांक १७-०७-२०२५
राज्यात शिक्षण घेणे दिवसेंदिवस कठीण होत चालले आहे. शाळा आणि महाविद्यालयांकडून मनमानी पद्धतीने फी आकारली जात असून सर्वसामान्य नागरिकांच्या अडचणी वाढल्या आहेत. शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी या समस्यांवर कायदेशीर कारवाई करण्याची घोषणा केली आहे. इंटिग्रेटेड अभ्यासक्रमाच्या नावाखाली सामायिक शिकवणीतून विद्यार्थ्यांची पिळवणूक होत असल्याचे उघडकीस आले आहे. विधिमंडळाला माहिती देताना मंत्र्यांनी या प्रकारांवर कायदेशीर कारवाई करण्यासाठी नवीन कायदा आणण्याची घोषणा केली आहे.