दुःखद निधन

नवीमुंबईतील एम पी सी टी हाॅस्पिटलच्या निष्काळजीमुळे अमित इथापे यांचा मृत्युं…!

मृत्यु हाॅस्पिटल व्यावस्थापनाच्या निष्काळजीपणामुळे झाला आहे असा आरोप मनसे विभागीय तालुका अध्यक्ष योगेश शेटे यांनी केला आहे.

दैनिक झुंजार टाईम्स

महेंद्र शंकर माघाडे:- पनवेल-उलवे प्रतिनिधी

दिनांक:- १०-०७-२०२५

नवीमुंबई:- शिवतेज गणेशोत्सव मित्र मंडळाचा कार्यकर्ता, सानपाडा सेक्टर-४ येथील कस्तुरी सोसायटीतील रहिवाशी  अमित इथापे, वय ३७ याचे मंगळवार दिनांक. ८ जुलै रोजी, सायंकाळी.७ वाजुन २० मिनीटांनी आजारपणामुळे निधन झाले.

अमित इथापे चा मृत्यु हाॅस्पिटल व्यावस्थापनाच्या निष्काळजीपणामुळे झाला आहे असा आरोप मनसे विभागीय तालुका अध्यक्ष योगेश शेटे यांनी केला आहे.

तिन-चार दिवसांपुर्वी सर्दी-तापावर उपचारासाठी अमित इथापे यास दाखल करण्यात आले होते. परंतु उपचाराच्या नावाखाली हाॅस्पिटल व्यावस्थापन लाखो रुपये उकळत असल्याचे कुटुंबियाच्या लक्षात आले, व अमित च्या प्रकृतीत ही काही सुधारणा दिसत नसल्यामुळे नातेवाईकांनी आम्ही दुसरीकडे उपचार करतो अमितला डिस्चार्ज द्या अशी विनंती केली. परंतु हाॅस्पिटलने नकार दिल्यामुळे, उपचाराच्या नावाखाली ५ लाख रुपये बील उकळणा-या हाॅस्पिटल व्यावस्थापनाने ५ लाख रुपयांपैकी ३ लाख रुपये अमितच्या कुटुंबियाने भरले असता मंगळवार दिनांक ८जुलै रोजी संध्याकाळी ७ वाजुन २०मिनिटानी अमित ईथापे, यास मृत घोषित करण्यात आले.

अमित इथापे यांच्या पश्चात, त्यांची ११महिण्याची लहान मुलगी,बायको,आई व लहान भाऊ असा परिवार आहे.

सदर घटनेनंतर मित्रपरिवारानी मनसे विभागीय तालुका अध्यक्ष योगेश शेटे यास फोन करून बोलावून घेतले असता त्यांनी हाॅस्पिटल मधली परिस्थिती व कुटुंबियाची आर्थिक बाजु समजुन घेतली व नवी मुंबई मनपा तालुका अधिकारी प्रशांत नवले यास फोन लावला असता त्यांनी एमपीसीटी हाॅस्पिटल व्यावस्थापनाशी बोलुन घेऊन उर्वरित २ लाख रुपये माफ करण्यास लावले. अशा प्रकारे मनसेच्या दणक्यामुळे विभागीय तालूका अध्यक्ष योगेश शेटे मुळे एमपीसीटी हाॅस्पिटल व्यावस्थापनांस उर्वरित २ लाख रुपये माफ करणे भाग पडले.

यानंतर अमित इथापे चे शव त्याच्या कुटुंबियाच्या ताब्यात देण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button