शैक्षणिक
राज्यातील खोट्या शाळा रडारवर.

दैनिक झुंजार टाईम्स
उमाजी मंडले:- पनवेल प्रतिनिधी
दिनांक:- १०-०७-२०२५
काही खाजगी संस्था चालक स्वतःच्या फायद्यासाठी राज्यातील काही शाळांनी शासकीय लाभ आणि सवलती मिळवण्यासाठी खोटी माहिती देऊन ‘अल्पसंख्यांक’ दर्जा मिळवल्याचा गंभीर आरोप भाजप आमदार प्रशांत बंब यांनी विधानसभेत केला. शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी स्वतंत्र समिती स्थापन करून विशेष मोहीम राबवण्याचे आश्वासन दिले आहे. शासकीय नियमानुसार, शाळेत किमान ५०% विद्यार्थी अल्पसंख्यांक असणे आवश्यक आहे.