ज्योतिर्लिंग विद्यालयात ३१ वर्षांनी सिंगल फेज(२४तास लाईट)

दैनिक झुंजार टाईम्स
अमोल पाटील:- कराड (जिंती) प्रतिनिधी
दिनांक:- ०९-०७-२०२५
जिंती येथील विद्युतीकरण कामासाठी जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून रयत सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन उदयसिंह पाटील (उंडाळकर) यांच्या प्रयत्नातून निधी मंजूर झाला असून त्यातून ग्रामीण विकास संस्थेचे ज्योतिर्लिंग विद्यालयात सिंगल फेज(२४तास लाईट) चे काम पूर्ण करणेत आले.
विद्यालयात सध्या त्रिफेज लाईट असल्याने शेती पंप च्या वेळेत ही लाईट उपलब्ध असायची शाळेची अनेक वर्षा पासून २४ तास लाईट ची मागणी होती ती या निमित्ताने पूर्ण झाली.याचा शाळेने उद्धाटन कार्यक्रम आयोजित केला होता.यावेळी मुख्याध्यापक अशोक कोठावळे यांनी या कामासाठी निधी उपलब्ध केल्याबद्दल संस्थेचे उपाध्यक्ष शंकरराव पाटील यांचे हस्ते ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र पाटील यांचा सत्कार केला,यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांचाहीं गुणगौरव करण्यात आला.
यावेळी विद्यार्थांना ज्ञान प्रबोधनी फोडेशन चे पदाधिकारी अमर पाटील यांनी विशेष असे मार्गदर्शन केले कार्यक्रमास शंकर पाटील गुरुजी,सोसायटीचे माजी चेअरमन वसंतराव पाटील,माजी सरपंच अशोक पाटील, निवृत्त पोलिस अधिकारी अशोक पाटील, सीताराम पाटील उर्फ बबन चेअरमन, शहाजी खोचरे, संभाजी पाटील, सुशांत पाटील,आण्णासो चव्हाण, शिवाजी पाटील, मेहुल आंबवडे,जयवंत पाटील,शाळेचे शिक्षक , पालक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.स्वागत व आभार संभाजी खोचरे यांनी मानले.